Heat Stroke Sakal
मराठवाडा

Heat Stroke : उष्माघाताने तरुणाचा मृत्यू; उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ

उन्हाच्या झळा व वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे.पैठण तालुक्यातील बिडकिन येथे ३० वर्षीय युवकाचा काल उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- रविंद्र गायकवाड

बिडकीन : उन्हाच्या झळा व वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे.पैठण तालुक्यातील बिडकिन येथे ३० वर्षीय युवकाचा काल उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पैठण तालुक्यातील हा पहिला बळी असल्याची चर्चा सुरू आहे. जैनपुर येथे फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला भोवळ व चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी ४ वाजेदरम्यान घडली आहे.

गणेश राधेश्याम कुलकर्णी (वय.३० वर्षे,रा.मारवाडी गल्ली बिडकिन) असे मयताचे नाव आहे. गणेश हा मित्र व नातेवाईक यांच्या सोबत जैनपुर येथे फिरण्यासाठी गेलेला असताना अचानक भोवळ व चक्कर येऊन खाली पडला होता.

त्यानंतर त्याच्या नाक,तोंडातुन फेस येऊन जागीच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे नातेवाईक शुभम कुलकर्णी याने उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणिता मात्रे यांनी गणेश कुलकर्णी यास मयत घोषीत केले आहे.

ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.गणेश कुलकर्णी हा एका खासगी कंपनीत मजुर म्हणून काम करत होता.त्याच्या पश्चात पत्नी,१४ महिन्याचा मुलगा,आई व वडील असा परिवार आहे. बिडकिन व परिसरात घटनेची माहिती मिळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे तर शवविच्छेदन अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत खात्रीलायक माहिती मिळेल.

- वैद्यकीय अधिकारी प्रणिता मात्रे,बिडकिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT