Deoni News 
मराठवाडा

वाहत्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, पावसाने केला घात

बाबासाहेब उमाटे

देवणी (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यासह परिसरात गुरुवारी (ता.२५) रात्री झालेल्या जोरदार पावसाने देवणी-लासोना रस्त्यावरील पुलावरुन तरुण वाहुन गेल्याने मृत्यु झाला. तालुक्यात गुरुवारी रात्री आठनंतर हलका ते जोरदार पाऊस झाला. तालुक्यात सर्वाधिक पाऊस देवणी मंडळात झाल्याने ओढ्या-नाल्यांना पाणी आले होते. यावेळी विजयनगर (ता.देवणी) येथील बालाजी पंढरीनाथ शिवपुरे (वय ३२) हा तरुण आपल्या दुचाकीवरुन देवणीकडे येत होता.

लासोना-देवणी रस्त्यावरील देवणी खुर्द गावाजवळ असलेल्या अरुंद पुलावरुन दुचाकीने जात असताना वाहत्या पाण्यात बुडुन त्याचा मृत्यू झाला. हा पुल कमी उंचीचा व अरुंद असल्याने सहा वर्षांपूर्वी याठिकाणी वाहुन जाऊन दोघांचा मृत्यु झाला होता. बालाजी शिवपुरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी देवणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत देवणी महसुल मंडळात सर्वाधिक ७३ मीमी पाऊस झाला असून बोरोळ मंडळात ५०, तर वलांडी मंडळात २७ मीमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत देवणी मंडळात २५४ , बोरोळ २१७, तर वलांडी १२७ मीमी पाऊस झाला आहे. तालुक्याच्या वार्षिक सरासरीच्या २४ टक्के पाऊस झाला आहे.

Latur Breaking : लातूर जिल्ह्यात १४ जण कोरोना पॉझिटिव्ह

विजेमुळे भिंतीला तडे
अहमदपूर (जि.लातूर) : शहरात वीज पडल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता.२५) दुपारी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी सैनिकीनगर येथील त्रिशाला प्रभाकर अंधोरीकर यांच्या घरावर पडलेल्या विजेने भिंतीला तडा गेला असून, घरातील विंधन विहिरीची मोटार, दोन पंखे, शेजारी असलेल्या धर्मपाल गायकवाड यांच्या घरातील दोन पंखे, तर सत्यकला विद्यासागर कोकणे यांच्या घरातील विंधन विहिरीची मोटार व दोन पंखे खराब होऊन जवळपास नगरात चाळीस हजारांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

मोठी बातमी! हातभट्टी ज्यांच्या जमिनीवर त्या मालकावरच आता दाखल होणार गुन्हे; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचा इशारा; तलाठी, ग्रामसेवकांना पत्र

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! बस वाटेत बंद पडल्यास ‘शिवाई’तूनही करता येणार त्याच तिकीटावर प्रवास; प्रवाशाने मागितले तर तिकीटाचे पैसेही मिळतात परत

SCROLL FOR NEXT