अविनाश पवार  
मराठवाडा

तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

यादव शिंदे

सोयगाव (जि.औरंगाबाद) ः पळाशी (ता.सोयगाव) येथील महादेव मंदिराच्या धारेश्वर धबधब्यावर आंघोळसाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून कुंडाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.13) उघडकीस आली. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाकी (ता.कन्नड) येथील पाच तरुण पर्यटक पळाशी शिवारातील धारेश्वर धारकुंड येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन धबधब्याच्या प्रवाहात आंघोळीसाठी गेले असता त्यातील अविनाश राजू पवार (वय 18) हा आंघोळीसाठी प्रवाहात उतरूला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा तोल जाऊन पाण्यात बुडाला.

दरम्यान मंगळवारी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगून आल्याचे ग्रामस्थांना आढळून आल्यावरून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुंडात शोधकार्य करून अविनाशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिंचोली लिंबाजी (ता.कन्नड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे, जमादार सुभाष पवार, प्रदीप पवार, कौतुक सपकाळ, दीपक पाटील आदी करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flight News: पुण्याहून उड्डाण करताच विमानाची चाके अडकली! १९२ प्रवाशांसह आकाशातच संकट; वैमानिकाने सुखरूप उतरवले विमान

Gadchiroli News: नक्षलवादी प्रभावातून नव्या विकासपर्वाकडे ;पंतप्रधान मोदी : जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोलीत राष्ट्रीय सोहळा

Pune Weather: पुण्यात थंडी वाढली; किमान तापमान १२.१ अंशांवर

Amit Shah: राहुल यांच्याकडून देशाची बदनामी ;अमित शहा यांची जोरदार टीका

Sakal Lit Fest: वसाहतवादी दृष्टिकोनातून इतिहास मुक्त व्हावा ;प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांचे मत; दिल्लीकेंद्री मांडणीस विरोध

SCROLL FOR NEXT