A youth has been killed near Kanlaba Pati in Wasmat taluka 2.jpgA youth has been killed near Kanlaba Pati in Wasmat taluka 2.jpgA youth has been killed near Kanlaba Pati in Wasmat taluka 2.jpg 
मराठवाडा

प्रेयसीसोबत का बोलतो म्हणून युवकाचा खून, कळंबा पाटीजवळील घटना

सुरेश पवार

हट्टा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ एका युवकास प्रेयसीसोबत का बोलतो. या कारणावरून डोक्यात लोखंडी एंगल मारुन खून केल्याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध मंगळवारी (ता.२४) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुंडा (ता. वसमत) येथील ज्ञानेश्वर चव्हाण (वय २१) हा त्याचा मावस भाऊ दिपक हातांगळे (रा.हट्टा) याच्यासोबत राहून झिरोफाटा येथे मोबाईल शॉपीवर काम करीत होता. तो नेहमी गुंडा ते झिरोफाटा मोटारसायकलने ये-जा करत असत. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी नेहमीप्रमाणे  शनिवारी (ता.२१) रात्री दुचाकीवर गुंडा येथे जात असल्याचे सांगितले.

मात्र, रात्री तो गावी पोहचला नसल्याने त्याचा नातेवाईकांनी शोध घेतला. तो सापडला नसल्याने हट्टा पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता त्याची दुचाकी हिवरखेडा येथील पुलाखाली दिसल्याने बिट जमादार व पोलिस पाटील यांनी पंचनामा करून दुचाकी ताब्यात घेतली. अधिक शोध घेतला असता सोमवारी (ता.२३) कळंबा शिवारात तुरीच्या शेतात या युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्यावर धारदार शस्त्राने घाव घातल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, याबाबत सुधाकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद खाडे, याने त्याच्या प्रेयसीसोबत का बोलतो? याचा मनात राग धरुन ज्ञानेश्वर चव्हाण यास विनोद कापुरे (रा. हट्टा), प्रविण अंभोरे (रा. परभणी) या दोघांनी जिवे मारण्याचा कट रचून ज्ञानेश्वरची मोटार सायकल अडवली. त्यास २१ ते २३ नोव्हेंबरच्या रात्री लोखंडी एंगलने डोक्यात व इतर ठिकाणी मारुन त्याचा खून केला. हा प्रकार कोणाला कळू नये, म्हणून त्याची मोटार सायकल हिवरखेडा  येथील पुलाखाली पाण्यात टाकली. तर ज्ञानेश्वरचा मृतदेह कळंबा शिवारातील तुरीच्या शेतामध्ये टाकून दिला होता.

या तिघांविरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रभारी सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी यतीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक जी.के.मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जी.के.मोरे करीत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT