latur  sakal
मराठवाडा

Latur News : मंदिरांत चित्र रेखाटत तरुण अयोध्येकडे ; कर्नाटकातील किष्किंधा येथील तरुण अयोध्येला निघाला सायकलवर

कर्नाटकपासून सायकलवर प्रवास, उदगीरमध्ये कारागिरीला दाद

सकाळ वृत्तसेवा

उदगीर- निडेबन : अयोध्येतील राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू आहे. त्यानिमित्त कर्नाटकातील किष्किंधा येथील तरुण अयोध्येला सायकलवर निघाला आहे. सुरेश कोटागोंडा (वय १८) असे त्याचे नाव आहे. वाटेतील मुक्काम तो संबंधित गावातील मंदिरात करीत आहे. तेथे रामनाम घेत रामाचे चित्र रेखाटतो आहे.

किष्किंधा येथून सात जानेवारीला सायकलवर निघालेला सुरेश हा गरीब परिवारातील आहे. आई- वडील, भाऊ असा त्याचा परिवार आहे. वडील मजुरी करतात भाऊ रिक्षा चालवतो. सुरेशला लहानपणापासून चित्रकलेची आवड असून यावरच त्याची उपजीविका अवलंबून आहे. धार्मिक कथा- कीर्तनाची आवड असल्याने तो चित्रेही देवांची काढतो. जय सियाराम लिहिलेला शर्ट, साधी पॅंट, गळ्यात रुद्राक्षाची माळ असा साधा पेहराव केलेला हा तरुण त्या-त्या गावांत लक्ष वेधतो.

प्रवासादरम्यान ज्या मंदिरात मुक्काम होणार असेल तेथील ग्रामस्थांना तो आपली माहिती सांगतो. मुक्कामाची विनम्रपणे परवानगी मागतो. मुक्काम मोफत न करता, संबंधित मंदिरात प्रभू श्रीरामाचे चित्र कोठे काढू, असे विचारून लगेच कामाला लागतो. चित्रकला पाहून कुणी पैसे देऊ केले तर तो ते नाकारत आहे.

फक्त जेवण, चित्र काढण्यासाठी रंगाची व्यवस्था करण्याची विनंती तो करीत आहे. येथील राम मंदिरात सुरेशचे आगमन झाले, त्यावेळी याची प्रचिती आली. या मंदिरात त्याने अत्यंत कमी वेळेत काढलेले श्रीरामाचे चित्र पाहून मंदिराचे विश्वस्त ॲड.अजय दंडवते आणि प्रमोद कुलकर्णी यांनी त्याचा सत्कार केला.

पुजारी हृषिकेश द्वैयंपायन, डॉ.भाऊसाहेब शेकपूरकर, बंडूनाना हुंडेकर, डॉ.संजय कुलकर्णी, धनंजय गुडसूरकर, श्रीकांत पोहरेगावाकर, निवृत्त नायब तहसीलदार धनेश दांताळे आदींनी त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि तो मार्गस्थ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT