file photo 
मराठवाडा

औंढा तालुक्यातील गोळेगाव कालव्यात उमरखेड येथील तरुणाचा बुडून मृत्यू

कृष्णा ऋषी

औंढा नागनाथ  ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील गोळेगावजवळ असलेल्या कालव्यात उमरखेड येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला असुन गुरुवारी ( ता. ११ )सकाळी त्याचा मृतदेह कालव्याबाहेर काढण्यात आला.

मयत ज्ञानेश्वर डोके (वय ३४) राहणार तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हा आपल्या कुटुंबासह उमरखेड येथून औरंगाबादकडे जात होता. गोळेगाव या ठिकाणी बुधवारी ( ता. १०) रात्री दहा वाजता जेवण करण्यासाठी ते धाब्यावर सर्व कुटुंबासह उतरले होते. यावेळी ज्ञानेश्वर डोके हा लघुशंका करण्यासाठी येथे असलेल्या कालव्याच्या काठावर गेला व त्याचा तोल जाऊन तो कालव्यात पडला व त्याचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन करुन मयतच्या नातेवाईकाकडे मृतदेह सुपुर्त

सदरील घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांनी जीवरक्षक पथकाला दिली व जीवरक्षक पथक त्या ठिकाणी गुरुवारी (ता. ११) सकाळी दाखल झाले. मयत ज्ञानेश्वर याला बार्शी टाकळी येथील जीवरक्षक पथकाने कालव्यामधून बोटीच्या साह्याने बाहेर काढले. यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, शैलेश वाईकर यांनी पाहणी करुन पंचनामा केला. औंढा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करुन मयतच्या नातेवाईकाकडे मृतदेह सुपुर्त करण्यात आला. यावेळी कालव्याच्या  काठावर बघ्याची गर्दी झाली होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीस आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर; आधी शहांना भेटले, आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट

Live-in Partner vs Dowry Law: पत्नी नाही, तरी गुन्हा? लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा कायद्याचा हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल

मला काहीही झालं तरी तू... हार्दिक जोशीने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- 'अक्षयाने १२- १३ मालिका सोडल्या...'

Horoscope: यंदा ३०० वर्षांनंतर १२ दुर्मिळ योग आणि ४ राजयोगांचा महासंयोग; महाशिवरात्रीला या राशींचं नशीब उजळणार!

PMC Standing Committee : स्थायी समितीचे सदस्य निवडताना भाजपकडून धक्कातंत्राचा वापर; १६ पैकी १३ नगरसेवक उपनगरांमधील

SCROLL FOR NEXT