Jalna Ambad Accident News
Jalna Ambad Accident News 
मराठवाडा

सुसाट निघालेल्या तरुणांना ब्रेक, दोन दुचाकी धडकल्याने दोघे गंभीर जखमी

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड-जालना महामार्गावरील शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रिलायन्स व महालक्ष्मी पेट्रोलपंपाच्या जवळ सोमवारी (ता.एक) दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान दोन दुचाकींची जोराची धडक झाल्याने यामध्ये दोन्ही दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील अभिषक दादासाहेब टकले (वय 20) व अमर टकले (21) व इतर दोघे दोन दुचाकीवरून चौघे जात असताना रस्त्यात अपघात घडला आहे. अभिषेक टकले व अमर टकले हे अंबड शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत.

नेहमीप्रमाणे दोघे अंबडला सोमवारी सकाळी दुचाकीवरून आले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान शहरातून रोहिलागड या आपल्या गावाकडे जात असताना सुसाट वेगाने एक पाठोपाठ जात असताना अंबड-जालना महामार्गावरील पेट्रोलपंपाजवळ दोन्ही दुचाकी पाठीमागून एकमेकाला धडकल्याने यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ग्रामस्थाच्या मदतीने दोघा जखमींना अंबड, जालना येथे उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. अंबड शहर व परिसरात सध्या सिमेंट रस्त्याचे काम मंदगतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी पुलाचे काम रखडले आहे. महामार्गावर दुभाजक नसल्याने सारखे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT