Road
Road 
मराठवाडा

झाल्टा-करोडी-तेलवाडी रस्त्याचे काम सप्टेंबरपासून

आदित्य वाघमारे

औरंगाबाद - धुळे-सोलापूर महामार्गाचा भाग असलेल्या झाल्टा-करोडी-तेलवाडी या महामार्गाचे काम सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सुमारे दीड हजार कोटींच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला तीस किलोमीटर लांबीचा वळणरस्ता उभारला जाणार आहे. करोडी ते तेलवाडीदरम्यान हा सहापदरी रस्ता दिवसाला सुमारे पन्नास हजार वाहनांचा भार वाहणार आहे. 

धुळे-सोलापूर या महामार्गाचा भाग असलेल्या झाल्टा फाटा-करोडी-तेलवाडी या रस्त्याच्या दोन भागांत निविदा काढण्यात आल्या होत्या. पहिल्यांदा १,०४३ कोटींचे हे काम आता सुधारित निविदेत १,५०० कोटींच्या घरात गेले.

या कामात औरंगाबाद शहराला वळसा घालून जाणारा एक ३०.२ किलोमीटरचा बायपास समाविष्ट करण्यात आला आहे. करोडी ते तेलवाडी कामालाही यादरम्यान सुरवात होणार असून, त्याची लांबी ५५.६ किलोमीटर एवढी आहे. औरंगाबाद शहरातून जाणारा जालना रस्ता, बीड बायपास या रस्त्यांवरील रहदारी कमी करण्यासाठी या बायपासची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. या रस्त्याचे सगळे कागदी सोपस्कार पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी आवश्‍यक मार्किंग, मोजणी, यंत्रणा आणि मनुष्यबळाची जमवाजमव सध्या सुरू असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणतर्फे देण्यात आली. बांधकाम आणि साठ मीटर रुंद सहापदरी रस्त्याची उभारणी या माध्यमातून केली जाणार आहे. 

पैठण रस्ता, पुणे मार्गावर उड्डाणपूल 
औरंगाबाद-पुणे, औरंगाबाद-नगर रस्ते या नव्या वळणरस्त्याला भेदतात. या रस्त्यावरील रहदारीला धक्का न लावता सोलापूर-बीडकडून येणाऱ्या वाहनांची विनाअडथळा वाहतूक होण्यासाठी दोन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. औरंगाबाद-पैठण रस्ता, औरंगाबाद-नगर रस्त्यावरील वाहतूक या उड्डाणपुलांच्या खालून तर सोलापूरकडून येत उत्तर भारताकडे जाणारी वाहने पुलावरून जातील.

महामार्गाची वैशिष्ट्ये
  चार ते सहापदरी रस्त्याची निर्मिती, रुंदी ६० मीटर. 
  प्रशस्त थांबे ः रस्त्यालगत दोन मीटरचा शोल्डर. 
  दोन उड्डाणपूल, साडेसात किलोमीटरचा सर्व्हिस रोड. 
  बसथांब्यांलगत रेलिंग, दुतर्फा क्रॅफ बॅरियर. 
  अडीच मीटर रुंदीचा दुभाजक. 
  सात बसथांबे, चार अंडरपास.  
  करोडीत होणार टोल नाका. 
  वेरूळ, कन्नडला रेस्ट एरियात वाहनतळ, कॅफेटेरिया.     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT