औरंगाबाद - प्रसुखच्या सदस्यांची नियोजनाची बैठक.
औरंगाबाद - प्रसुखच्या सदस्यांची नियोजनाची बैठक. 
मराठवाडा

'जिका'च्या मुली चालवताहेत वसतिगृहात सहकार खानावळ

अतुल पाटील

औरंगाबाद : 'विना सहकार नाही उद्धार' हे ब्रिदवाक्‍य घेऊन एकेकाळी महाराष्ट्रात क्रांती करणारी सहकार चळवळ एकीकडे मोडकळीस येत आहे. दुसरीकडे औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकत्रित येत "प्रसुख' ही खानावळ "ना नफा, ना तोटा' या तत्वावर नव्या वर्षात सुरु केली आहे. नियोजन करणाऱ्या मुलींचे आठवड्यातून एक-दोन तास जात असले तरी, शंभरावर मुलींना 'फर्माइस'नुसार गरमा-गरम जेवण मिळत असल्याने खुश आहेत.

महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या अपूर्वा चहांदे, धनश्री बनसुले, संपदा अहाळे, चिन्मया चौधरी यांनी पुढाकार घेत वसतिगृहातील मुलींसमोर सहकारी तत्वावरील खानावळीची कल्पना मांडली. यावेळी आपल्यालाच भाज्या कापाव्या लागतील काय? जास्तीचे पैसे द्यावे लागतील का? या भीतीने सुरवातीला नकार मिळाला. "तसे काही होणार नाही.' असा विश्वास मिळाल्यावर होकार आला. महाविद्यालयाची परवानगी घेतली. उपलब्ध भांडी महाविद्यायलयानेही दिली. रंगरंगोटी आणि गॅसजोडणी केली. मात्र, अतिरिक्‍त भांडी, रोजच्या आवश्‍यक वस्तू, स्टेशनरी यासाठी पैसे उभे करण्यासाठीही मुलींनी खास आर्थिक नियोजन केले आहे.

मुलींच्या नियोजनात, देखरेखीत सगळ्याच मुलींना आता चवदार जेवण मिळत आहे. विशेष म्हणजे, ही सहकार खानावळ चालवण्यासाठी योग्य मोबदला देऊन व्यवस्थापक, स्वयंपाकी आणि महिलांची नेमणूकही करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारासाठी मुलींनी येस बँकेत खातेही उघडले आहे. खानावळीसाठी लागणारे साहित्य काय आणायचे यापासून जेवण काय द्यायचे हे ठरवण्यासाठी साहित्य खरेदी, आर्थिक व्यवहार, अन्न आणि स्वच्छता, प्रतिसाद अशा चार समित्या बनवल्या आहेत. प्रत्येक समितीत अंतिम वर्षाची एक विद्यार्थिनी असून, इतर मुली तिसऱ्या आणि दुसऱ्या वर्षांच्या आहेत. नव्या वर्षात प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ यांच्या हस्ते सुरवात झाली. 

असे साधले आर्थिक गणित...

मुलींच्या वसतिगृहातील 133 मुलींपैकी 114 मुली "प्रसुख' खानावळीच्या सदस्य बनल्या आहेत. प्रत्येकी 3500 रुपये घेतले. 1200 रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचे पैसे, सदस्य शुल्क 500 आणि अग्रीम रक्‍कम घेतली आहे. सहकारी तत्वावरील खानावळ असल्याने जेवणाशिवाय नाष्टा, स्टेशनरीमधून मिळणारे उत्पन्न आणि जेवणातून शिल्लक राहणारे पैसे सदस्यांना परत किंवा पुढील महिन्यात वळते होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT