Aurangabad-ZP
Aurangabad-ZP 
मराठवाडा

‘झेडपी’त काँग्रेससोबतची आघाडी शिवसेनेने तोडली

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली शिवसेनेने काँग्रेससोबतची आघाडी बुधवारी (ता. २७) संपुष्टात आणली. महापौर बंगल्यात शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समन्वयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात संयुक्‍त प्रचारसभांना सुरवात केली आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेत शिवसेनेची काँग्रेसबरोबर आघाडी असल्याने ही आघाडी तोडावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह सदस्यांकडून केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. २७) शिवसेनेचे नेते तथा युतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत समन्वयासाठी बैठक झाली. यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, बसवराज मंगरुळे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. अंबादास दानवे यांनी सांगितले, समन्वयक समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे शिवसेना-भाजप युतीचा संयुक्‍तपणे प्रचार होणार आहे.

जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडण्याचा निर्णय झाला. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार यापुढे सगळ्या निवडणुका शिवसेना-भाजप युतीनुसारच लढणार आहोत.
- चंद्रकांत खैरे, खासदार

शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तोडावी अशी मागणी होती. त्यानुसार खासदार खैरे यांनी जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आचारसंहिता संपल्यानंतर भाजपकडे येईल. 
- एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT