Nagpur_old

Buldana: आमदार गायकवाड यांच्या प्रयत्नाने पंधरा वर्षांपासूनची मागणी पूर्ण; बुलडाण्यातील कृषी महाविद्यालयाला मान्यता

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा : होणार... होणार... म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून बुलडाण्यातील कृषी महाविद्यालयाचा मार्ग अडखळत होता. मात्र आमदार गायकवाड यांचे सातत्याने प्रयत्न व जोरकस पाठपुराव्यामुळे हा महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता.२८) झालेल्या बैठकीत १४६ कोटी रुपयांच्या खर्चाच्या या महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे.

त्यामुळे आता लवकरच बुलडाण्यात कृषी महाविद्यालय सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाविद्यालयाच्या पूर्णत्वासाठी तातडीने प्रयत्न करून पुढील सत्रामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

सुमारे पंधरा वर्षांपासून बुलडाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी महाविद्यालय व्हावे, अशी मागणी जोर धरत होती. दरम्यानच्या काळात माजी मंत्री एकनाथराव खडसे पालकमंत्री असताना त्यांनी या कृषी महाविद्यालयासाठी प्रयत्न केले.

परंतु हे कृषी महाविद्यालय तळणी येथे करण्यासाठी त्यांनी जोरदार हालचाली केल्या. नंतरच्या काळात बुलडाण्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. भाऊसाहेब फुंडकर हे कृषिमंत्री झाले व त्यांनी देखील महाविद्यालय जिल्ह्यात व्हावे, विशेषतः खामगावात व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले, मात्र दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्याने हा प्रश्न रखडला होता.

नंतरच्या काळात या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले. त्यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून हा प्रश्न लावून धरला.

दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या प्रस्तावाला सकारात्मक होते. दरम्यानच्या काळात काही त्रुटी पूर्ण केल्यानंतर आज मंत्रिमंडळाने हा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुले शिकून अधिकारी झाली पाहिजेत.

या भूमिकेतून आपण हा प्रश्न पोटतिडकीने मांडल्याचे आमदार गायकवाड म्हणतात. बुलडाण्यामध्ये जागेचीही उपलब्धता असल्याने या महाविद्यालयाच्या उभारणीचा मार्ग लवकरच प्रशस्त होईल, अशी बुलढाणेकरांना अपेक्षा आहे.

आजवर आपण जनतेला जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. गेल्याच महिन्यात वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. आता कृषी महाविद्यालय होणार. यापुढील मिशन फूड पार्क व टेक्सटाईल पार्क तसेच सूतगिरणी हे राहणार आहे. ते देखील लवकरात लवकर मंजूर करून घेऊ.

-संजय गायकवाड आमदार, बुलडाणा.

असे असेल कृषी महाविद्यालय

बुलडाणा येथील कृषी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी मंत्रिमंडळाने १४६ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.

बुलडाणा शहरालगत कृषी संशोधन केंद्राच्या सुमारे १५० एकर जागेमध्ये हे महाविद्यालय उभारले जाईल. यामध्ये खेळाची मैदाने व वस्तुतिगृहासह इतर सर्व सोयी सुविधा राहणार आहेत. २०२४ मध्ये याची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT