tushar ghugare
tushar ghugare sakal
Mpsc Upsc Articles

Success Story : बारावीत भोपळा , 'एमपीएससी' मध्ये मात्र पहिल्याचं प्रयत्नात यश

सकाळ वृत्तसेवा

धुळे : घरची परिस्थिती जेमतेम, वडील शिपाई कामगार, बारावीच्या परिक्षेत आलेलं जिव्हारी लागणारं अपयश, आईचं कोरानाच्या आधीच निधन झालेलं, एकुलती एक बहीण तेही अपंग, आईच्या निधनानंतर घर सांभाळण्याची आलेली जबाबदारी आणि एवढं सगळं असतानाही अवघड अशा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं यश.

हा प्रवास आहे धुळ्याच्या तुषार घोगरे याचा. त्याने एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात पीएसआय बनण्याचा मान मिळवलाय.

बारावीची परिक्षा ही आपल्या आयुष्याचा टर्निग पाॅईंट मानली जाते. करियर च्या नव्या वाटा येथुन चालु होतात, असं म्हटलं जातं. या परिक्षेत कमी गुण आले की काही विद्यार्थी अगदीच टोकाच पाऊल उचलुन निराश होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. मात्र काही विद्यार्थी हे नापास झाल्यानंतर खचुन न जाता एक नवी सुरुवात करु पाहतात.

बारावीत सर्व विषयांत नापास झाल्यानंतरही जिद्द, सातत्य,आत्मविश्वासाच्या बळावर 'एमपीएससी' सारख्या कठीण परिक्षेत यश मिळवता येत याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे धुळ्याचा तुषार संदीप घुगरे.

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्य़ा परिक्षेत त्याची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली. कौतुक म्हणजे त्याने पहील्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे.

बारावीत तो वाणिज्य शाखेच्या सर्व विषयांत नापास झाला आणि घरची मंडळी ओरडली हा राग त्याने मनावर घेेतला परंतु चुकीच्या मार्गाने न घेता चांगल्या मार्गाने घेऊन 'एमपीएससी'ची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश देखील मिळवले.

असे दांडगी इच्छा ज्याची

मार्ग तयाला मिळतील सत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर!

अशक्य असे या जगात काहीच नसते. जर आपली प्रबळ इच्छा असेल तर आपण ती गोष्ट नक्कीच मिळवु शकतो. तुषार हा मुळचा धुळयाचा घरची परिस्थिती जेमतेम वडिल महानगरपालिकेत शिपाई, आईचं कोराणा काळात निधन आणि बहिण हॅडिकॅपड एवढं सगळ असतांना स्वत:ला खंबिर ठेवत अभ्यास करुन यश मिळवले. सुरुवातीला झीरो असणारा, जाणिव झाल्यानंतर कसा रियल लाईफ हिरो बनला. हे कौतुकास पात्र आहे.

मल्लखांबमध्ये मिळविले सुवर्णपदक

आपल्यातले गुण शोधले की आपण यशाच्या उंच शिखरावर येऊन पोहचताे. घुगरे हा मल्लखांब खेळाडू आहे. पंजाब मधील पटियाला येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक, तर ग्वाल्हेर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळविलेले आहे.

अपयशाने खचून न जाता जिद्द, आत्मविश्वास ठेवल्यास कुठल्याही परीक्षेत यश मिळते. स्पर्धा परीक्षेत अभ्यासाचे नियोजन महत्त्वाचे आहे.

-तुषार घुगरे, पोलिस उपनिरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT