muktapeeth 
मुक्तपीठ

मुका झाला बोलका!

अच्युत चक्रदेव

मुका तबल्याची साथ कशी करणार, ही शंका विचारली आणि मुका बोलका झाला.

महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रीजी यांचा जन्म दिन हा "बंदी कल्याण दिन' म्हणून पाळला जातो. येरवडा मध्यवर्ती कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख तुरुंगाधिकारी म्हणून मी बंदीकडून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमाची पूर्वसूचना सर्व कारागृह विभागांकडे पाठविली होती. पेटी-तंबोरे आले. फक्त तबलजी आलेला नव्हता. बंदीचा कार्यक्रम प्रमुख नगरचा दीक्षित होता. त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला, 'साहेब, मी मुक्‍याला बोलावतो.'' मनात म्हटले, 'असेल कुणी मुकुंदा.'' दीक्षित म्हणाला, 'साहेब, हा पावशा नाना मुका आहे. पण, तबला छान वाजवतो.''

मी आर्श्‍चचकित झालो. त्याला जवळ बोलावले. मुका बहुतेकदा बहिराही असतो. हा न ऐकता साथ कशी करणार? मी खोदून खोदून विचारले, तेव्हा तो म्हणाला, 'साहेब, मी मुका नाही. पण, माझ्या हातून चुलत भावाचा खून झाला. त्याची सक्तमजुरी भोगत आहे. मी चुलत भावांवर फरशी उगारताना माझी आई आमची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आली आणि चुकून माझ्या फरशीचा एक जोरदार फटका आईच्या हातावर बसला. तिचा एक हात बिनकामी झाला. ही गोष्ट जिव्हारी लागली. प्रत्यक्ष जन्मदात्या आईला काय ही भयंकर शिक्षा. मी ठरवले, की ही शिक्षा भोगून सुटेपर्यंत मी कोणाशीही एकही शब्द बोलणार नाही. आणि माझा निश्‍चय मी आतापर्यंत कसोशीने पाळत आहे. पण, तुम्ही ते ओळखले.'' मी त्याला म्हणालो, 'तुझे मातृप्रेम अगाध आहे. पण, तू काहीच बोलला नाहीस, तर तुझे स्वरयंत्र बंद पडेल. तुला कधीच बोलता येणार नाही. जिथे कोपऱ्यात कोणी नसेल, अशा ठिकाणी तू मोठ्याने गाणे म्हण. तबल्याच्या तालांची मोठ्याने उजळणी कर.'' पुढे तसा सराव तो करू लागला. मला एवढेच माहीत होते, की गाता गळा-वाजते वाद्य बंद पडता नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT