मुक्तपीठ

आपलेही स्थितीवर नियंत्रण हवेच!

डॉ. जयंती पराग चौधरी

"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' असे नेहमी म्हटले जाते. वैद्यकीय क्षेत्रात असल्याने या उक्तीची प्रचिती वरचेवर येतच असते. प्रथम औषधे देण्यासाठी व्यक्तीच्या प्रकृतीची माहिती असावी लागते. दुसरे तिच्या स्वभावाची माहिती करून घ्यावी लागते. जशी हट्टी व्यक्ती, व्यवस्थित, टापटीप, समजूतदार, कुरकुर करणारी, नैराश्‍यग्रस्त, मिश्‍किल, खोडकर अशा अनेक प्रकारच्या वल्ली हाताळण्यात डॉक्‍टरांना तरबेज व्हावे लागते. समोरच्या व्यक्तीचा प्रश्‍न लगेच लक्षात घेऊन त्यानुसार त्यांचे समाधान करणेही गरजेचे असते. त्यासाठी प्राप्त स्थितीवर नियंत्रण राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. 
--- 
सध्या आपल्याला सरकारकडून सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्यासाठी वारंवार सूचना येत आहेत. हे अंतर बाहेरच नव्हे, तर सध्या घरातही सर्वच बाबतीत आवश्‍यक वाटते आणि आवश्‍यक असतेच. आपण बघत आहोत, की काही ठिकाणी घरांमध्ये राहणारे साधारण सर्वच लोक "कोरोना'ग्रस्त आढळून आले. जर घरात प्रत्येकाची ताटे, वाट्या, पेले, टॉवेल, कंगवे, चादरी, बिछाने आदी वेगळे ठेवले आणि घरातही शक्‍य असेल तर सुरक्षित अंतर ठेवल्यासहे प्रमाण नक्कीच कमी होईल. काही घरे लहान आणि कुटुंबे मोठी असतात, असा प्रकार असेल तर मग त्रास होऊ शकतो. घरातही अंतर ठेवायचे हे सांगूनही काही लोक ते पाळत नाही. 
काही हट्‌टी लोक उगाच हळूच विचारतात, की या महिन्यात गर्भ ठेवायचा आहे चालेल ना? ठेवावाच लागेल. आजी म्हणते, "घरात मूल हवे.' कसे चालेल? आता काही दिवस नाही चालणार. व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवायचे आहे म्हणून गर्भधारणेचीही सध्या घाई करू नये. 
कारण जळगाव जिल्हा "रेड झोन'मध्ये आहे. जे जिल्हे "ग्रीन झोन'मध्ये आहेत त्यांना असा विचार करता येऊ शकतो. पण सध्या काही महिने साधारण सर्वच व्यक्तींनी गर्भधारणा आणि शारीरिक संबंध टाळले तर योग्यच ठरेल. तुम्ही अगदीच शेतात वगैरे दूर निर्जन ठिकाणी राहत असल्यास तुमचा दोघे पती-पत्नी इतर कोणाशीही कसलाच संपर्क नाही. तुम्ही संपूर्ण निरोगी असाल तरच हा विचार करू शकता. पण शहरात भाजी आणणे. किराणा आणणे. कामावर जाणे अशा इतर बऱ्याच गोष्टी जर दोघांपैकी एक जण करत असेल, तर तुम्ही शारीरिक संबंध टाळलेलेच बरे होईल. 
"रेड झोन'मध्ये राहत असलेल्या व्यक्तींनी घरात तसेच बाहेरही सर्वच प्रकारे सुरक्षित अंतर राखल्यास आपण "कोरोना'वर बऱ्याच अंशी विजय मिळविण्यात यशस्वी होऊ. मध्यंतरी जळगाव शहरात वेश्‍याव्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई झाली. "कोरोना'काळात अशी ठिकाणे अत्यंत धोकादायक ठरू शकतात. 
एकापेक्षा जास्त व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे हे तसे इतरही लैंगिक आजारांच्या दृष्टीने धोकादायकच असते. व्यक्तीच्या त्वचेवर, घशात, नाकामध्ये, पुरुषांच्या विर्यात, स्त्रियांच्या योनीमार्गात "कोरोना' आढळलेला आहे. त्यामुळे सध्या शारीरिक संबंध प्रस्थापित करणे योग्य ठरणार नाही. तसेच लघवी, विष्ठेमध्येही "कोरोना' आढळलेला आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत खूप जागरूक राहणे आवश्‍यक आहे. 
चुकून गर्भधारणा झाल्यास गर्भ सोनोग्राफीमध्ये व्यवस्थित असल्यास गर्भ राहू देण्यास हरकत नसते. पण हे निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार ठरविण्यात येतात. ते वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावेत. "कोरोना'चा प्रभाव पुढे कसा असेल याबाबत आणखी काहीही सांगता येणार नसल्याने सध्याच्या परिस्थितीत घरीदारी, सर्वांकडे सुरक्षित अंतर राखणे योग्य ठरेल, असे वाटते. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT