muktapeeth 
मुक्तपीठ

माझ्या मृत्यूची गोष्ट

डॉ. दीपक शिकारपूर

आपल्या मरणाची बातमी आपणच ऐकली तर? होते असे कधी कधी. कुणाच्या तरी ऐकण्यात चूक होते आणि आपले मरण फोनवर ऐकू येते.

आपुले मरण पाहिले म्या डोळा। तो जाला सोहळा अनुपम्य। आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने।। असे संत तुकाराम महाराजानी म्हटले आहे. मरण हे अटळ आहे. माझी पन्नाशी उलटली, पण उमर नाही जाहली. हे सगळे आठवले एका दूरध्वनीमुळे. गेल्या वर्षी एका सकाळी मी सिंहगड रस्त्यावर पु. ल देशपांडे उद्यानात नेहमीप्रमाणे चालायला गेलो होतो. हे उद्यान देशातील एक सर्वोत्तम नयनरम्य उद्यान आहे. इथे चालणे हा एक उत्साहवर्धक अनुभव असतो. तेवढ्यात भ्रमणध्वनी वाजला. आवाज नीट ऐकू येण्याची थोडी समस्या होतीच. तरी ऐकत होतो. सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथा यांचा फोन होता. एवढ्या सकाळी मुथा यांनी फोन का केला असेल, असा विचार करीत मी फोन घेतला. मी फोनवर "हॅलो' म्हणताच त्यांनी विचारले, ""तू दीपक शिकारपूरच बोलतोय ना?'' ""हो, मीच बोलतोय. सांगा, इतक्‍या सकाळी काय काम काढले?'' मीच फोनवर असल्याची खात्री झाल्यावर म्हणाले, ""इकडे बोल.'' आता माझ्याशी कृष्णकुमार गोयल बोलत होते. मीच बोलत असल्याची त्यानीही खातरजमा केली. मी त्यांना म्हटले, ""साहेब, काय भानगड आहे?'' ते म्हणाले, ""आम्ही काही मित्र विद्यापीठ उद्यानात प्रभात फेरीला आलो आहोत. आमच्यातील एकाने छातीठोकपणे सांगितले की, काल तुझे मुंबईत अपघाती निधन झाले. म्हणून फोन केला.'' मला झालेला गोंधळ लक्षात आला.

आदल्याच दिवशी मुंबईत पूर आला होता आणि त्यात गेले होते ते डॉ. दीपक अमरापूरकर. आडनाव साधर्म्याने घोळ झाला होता. मी गोयल-मुथा या सन्मित्रांना सांगितले की, "मी हयात आहे. अजून तरी धडधाकट आहे आणि तुमच्याशी फोनवर बोलतो आहे.' नंतर मी गोयल व मुथा साहेबांना कधीही भेटलो की ते विचारतात, "आहेस?' मीही म्हणतो, "अजूनही जिवंत आहे.' दोघेही हसतो. इतर लोकांना कळत नाही की, हे दोघे अशी कशी चौकशी करतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT