meditation 
मुक्तपीठ

बुरख्याआड अनेक चेहरे

प्रशांत आर्वे चंद्रपूर

रामजन्मभूमी विषयक ऐतिहासिक खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टात लागला आणि या विषयावर एकदाचा पडदा पडला. परंतू लोकशाही देशात, लोकशाही मार्गाने खटला जिंकल्यानंतर या देशातील बहुसंख्य समाजाला आनंद होणे स्वाभाविक होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर सर्वाधिक दु:ख जर कुणाला झाले असेल तर ते पुरोगामी आणि स्वतःच्या कोशात राहणाऱ्या बुद्धीजीवी वर्गाला.

शरद पवारांनी राम मंदीर बांधण्यापेक्षा कोवीड हॉस्पिटल बांधण्याची गरज असल्याचे विधान केले आणि समस्त पुरोगामी वर्ग मग सुखावला. या समाजातील बुद्धीजीवी वर्गाची बांधिलकी समाजाशी नसून त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या वा त्याला शरण गेलेल्या वैचारिक भूमिकेशी आहे. मग ती वैचारिक भूमिका एखादा पक्ष, व्यक्ती वा विचार याला बांधली असेल तरी चालेल. मुळात उजव्यांना चिकित्सेचे वावडे आहे असा आरोप करत असताना पुरोगाम्यांची विचार शरणता देखील चिकित्सेला बाधा आणनारी आहे.

या देशातील सामान्य माणूस धर्मभोळा आहे. त्याच्या काही श्रद्धा आहे. पण त्याच्या श्रद्धांचा नेहमीच पुरोगाम्यांनी उपहास केला. एखादी अंधश्रद्धा समूळ नष्ट करायची म्हणजे केवळ ती पाळणाऱ्याचा उपहास करून ती मिटणार नसते. तर सबंधित समाजाच्या मनावर फुंकर घालत त्यातील फोलपणा स्पष्ट करत गेले पाहिजे. पण आमच्या देशात आम्ही धर्म, देव न मानणारे जणू अवतारी पुरुष आहोत आणि या मूर्ख माणसांच्या उद्द्धाराकरिता आपला जन्म झालाय या थाटात धर्मश्रद्ध समाजाला दुषणे देत राहिल्याने या वर्गाला समाजात फार महत्व उरले नाही. पण पुरोगामी या शब्दाचे सरसकटीकरण करणे देखील चुकीचे आहे. हे मान्य केलेच पाहिजे.

कारण महाराष्ट्राच्या पुरोगामी विश्वातील अत्यंत आदरणीय नाव म्हणजे नरहर कुरुंदकर. त्यांच्या पत्नी प्रभावतीबाईंनी लिहून ठेवलंय की माझे पती नास्तिक आणि देव न मानणारे असले तरी माझ्या धार्मिक श्रद्धांचा त्यांनी कधीच अपमान केला नाही की त्या टाकून दे म्हणून आग्रह धरला नाही. उलट आपल्या बायकोचे मन राखण्यासाठी ते काही धार्मिक कार्यात सहभागी झाले. समाज सश्रद्ध व्हावा की अश्रद्ध व्हावा याची चर्चा आपल्याकडे पुरोगामी विश्वात होत नाही. आपली सगळी शक्ती समाजाला अश्रद्ध करण्यात घालवल्याने पुरोगामी चळवळीच्या हाती फार काही लागले नाही. याउलट उजव्यांना बळ मिळत गेले. वेळ आहे ती समाज सश्रद्ध व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची, उपहासाची जागा विवेकाने भरून काढण्याची.

मला डॉ आ. ह. साळुंखे यांच्या भाषणातील एक वाक्य इथे मांडले पाहीजे. ते म्हणतात आमचा स्वतःला पुरोगामी समजणारा कार्यकर्ता एका बहुजन समाजाच्या घरी जातो. घरातील माणसांच्या समोर देव कसे थोतांड आहे याचे भाषण ठोकतो, मी घरातले देव फेकून दिले तसे तुम्ही पण फेकले पाहिजे हे सांगतो. घरातली म्हतारी मंडळी ते सारे ऐकत असते.त्याच्या समोर काही बोलत नसली तरी पुढे हा कार्यकर्ता ना समाजाच्या मनात जागा निर्माण करू शकत ना मेंदूत. रामकृष्ण परमहंसाकडे अफूचे प्रचंड व्यसन असलेला एक माणूस आला. म्हणाला महाराज व्यसन सोडवा. रामकृष्ण म्हणाले रोज किती गोळ्या घेतो? दहा तो उत्तरला. मग असं कर आज नऊ घे. रामकृष्ण जाणून होते दुर्धर आजार असे तडकाफडकी सुटत नसतात. समाज परिवर्तन म्हणजे काय जादूची छडी आहे ? की ती पुरोगाम्यांनी एक भाषण ठोकावे आणि झाला बदल. मुळात स्व-चिकित्सा करीत करण्याचे हे काम आहे.

संवाद खरेतर साऱ्या विचार विश्वाला एकत्र आणणारी प्रक्रिया आहे. पण हा संवादच संपवल्या गेला. घट्ट कुंपणात विचार आणि माणसे बंदिस्त केल्या गेली. जातीवरून आणि आडनावावरून पुरोगामी की प्रतिगामी ठरविण्याची नवी टूम महाराष्ट्रात आली आहे. हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे असे जाहीर करताना आगरकर आणि कर्वेंचा महाराष्ट्र नसतो. त्यांना पद्धतशीर बाजूला केल्या जातं आणि इथे पुरोगामी बुरख्याच्या आड लपून बसलेले संकुचीत आणि जातीय चेहरे उघडे पडतात.

शामची आई आणि शाम यांच्यावर माध्यमांमध्ये अनेक विकृत मिम्स प्रचारित केल्या गेले. जेष्ठ शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी त्याला विरोध केला. लोकांनी त्यांची जात काढली. कुलकर्णी आहात म्हणून तुम्हाला साने गुरुजींचा पुळका येतोय का? असा कुत्सित प्रश्न विचारल्या गेला. कुलकर्णी यांना मी जात सोडली हे ओरडून सांगावे लागणे आणि स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या एकानेही त्यांच्या पाठीशी उभे राहू नये यातच या ढोंगी पुरोगामित्वाचा पराभव आहे. अमेरिकेत जॉर्ज फ्लोईड मारल्या गेला. त्याचा विरोध करायला गोरे आणि काळे एकत्र रस्त्यावर आले. म्हणून काळ्या माणसांनी गोऱ्या माणसांच्या हेतूवर कुणी शंका घेत तू आमच्यातला नाहीस हे सांगितले नाही.

पुरोगामित्वाच्या नावावर जातीय विद्वेष निर्माण होत जाताना विचारी माणसांनी मौन राखले आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागत आहे. डॉ आंबेडकर, आगरकर, शाहू, फुले कर्वे, अत्रे, कुरुंदकर, गोपाल हरी देशमुख या पुरोगामी मंडळींचा महाराष्ट्र आज मात्र पुरोगामित्वाचे बुरखे लावून केवळ आपल्या वैचारिक कोशाला आणि राजकीय बांधिलकीला गोंजारणार्या ढोंगी माणसांनी व्यापला आहे हे दुर्दैव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT