muktapeeth 
मुक्तपीठ

शुक्रवारची सवाष्ण

क्षमा एरंडे

परंपरेने चालत आलेले व्रत काळानुसार बदलले पाहिजे, नव्याशी सांगड घातली पाहिजे.

"मावशी, येत्या रविवारी श्रावणातील शुक्रवारची सवाष्ण जेवायला घालणार आहे, पण पुरणपोळीचाच नैवैद्य दाखविला पाहिजे असे काही नाही ना? कारण मला एकटीला एवढी सवय नाही, साधाच बेत करीन म्हणते.'' सुलेखाचे काही सांगताना चुकतेय की माझी ऐकण्यात चूक होतेय! मी विचारलेच, ""शुक्रवारची सवाष्ण रविवारी हा काय प्रकार आहे.'' ""अगं, सगळ्यांना त्यादिवशी सुटी असते ना. एरवी आठवडाभर आमचे कामाशी लग्न लागलेले असते. व्रतवैकल्य करावी अशी आम्हा नोकरदार महिलांची खूप इच्छा असते ग, पण तेवढ्यासाठी प्रत्येक वेळी रजा घेणे शक्‍य नसते. मग हक्काचा रविवार असतो ना आमचा. मुलांना पण आपले सण, व्रत यांची माहिती असायला हवी. ''

हा बदल ऐकून छान वाटले. त्यातही ती वॉचमनच्या बायकोला सवाष्ण म्हणून आणि तिच्या मुलीला कुमारिका म्हणून बोलावणार आहे. आपल्या घराचे, सोसायटीचे रक्षण करणाऱ्या कुटुंबाची थोडीफार उतराई होणे सुलेखाला गरजेचे वाटले, हे खरेच कौतुकास्पदच म्हणावे लागेल. पूर्वी मंगळागौर पूजन मंगळवारी सकाळीच होत असे. आता यातही बदल होत चालला आहे. मंगळागौर पूजणाऱ्या बहुतांशी नोकरदार असतात, प्रत्येक मंगळवारी सुट्टी घेणे शक्‍य नसते. त्यामुळे हल्ली या पूजा संध्याकाळी केल्या जातात. काहीवेळा मंगळवारी पूजा व रविवारी मैत्रिणींना जमवून मंगळागौरीचे खेळ असेही होते. मुंबईच्या काही महिला रेल्वेत जाता येता अनेक सण समारंभ साजरे करीत असतात. माझ्या परिचयातील अनेक जणी पारंपरिक व्रत वैकल्ये एखाद्या अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात अन्नदान अथवा आर्थिक हातभार लावून साजरा करतात. माझी एक मैत्रीण तिच्या कामवालीच्या मुलीचा दरवर्षी संपूर्ण शिक्षण खर्च करते. आमच्या सुलेखासारख्या अनेक स्त्रिया व्रत वैकल्याच्या माध्यमातून हा सामाजिक बांधिलकीचा वसा उतणार नाही, मातणार नाही असे म्हणत पूर्णत्वाला नेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT