muktapeeth 
मुक्तपीठ

आठवण गणेशोत्सवाची

मधुरा धायगुडे

उत्सवातील उत्साह अजून तोच आहे; पण पूर्वीचा उत्सवातील सक्रिय सहभाग कमी होत चालला आहे.

लहानपणापासून बरेच गणेशोत्सव बघितले, उत्सवाचे स्वरूप बदलले; पण बालपणीचा ब्राह्मण आळीतील गणेशोत्सव विशेष आठवतो. गणेशोत्सव आला, की देखाव्यांची तयारी होत असे. वरच्या आळीत मांडव पडायचा. आधीच दहा दिवस देखाव्याची जमवाजमव सुरू व्हायची. "मित्र मंडळाच्या' त्या गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी सारे कार्यकर्ते तिथे राहणारे व पुण्यात राहणारे आपापले योगदान आवर्जून देत असत. देखाव्याची जबाबदारी मांडके कंपनी अगदी आवर्जून पुण्याहून येऊन निभावत असे. तेव्हा "अभिनव'मध्ये शिकवणारा मामा दहा दिवस रजा घेऊन येत असे. त्याचा मुक्काम आमच्याकडेच असे. हा मामा व प्रकाश योजनेची जबाबदारी सांभाळणारे मास्तरकाका यांची आठवण आवर्जून होते. त्यांचे येणेजाणे आमच्या घरी कायम असे. माझे बाबा मित्र मंडळाचे सेक्रेटरी होते. गणपतीपुढे रांगोळी घालण्याचे काम शाळेत असलेल्या आम्ही मुली करत असू. सकाळ-संध्याकाळची आरती ही विशेष बाब असे. मांडवाला बांधलेली घंटा आरती म्हणताना कोणी वाजवायची हा आम्हा मुलांचा वादाचा विषय असायचा. त्या दहा दिवसांतल्या एका रविवारी गणपती अथर्वशीर्षाचा कार्यक्रम असतो. रविवार आवर्जून ठरविला जातो. मित्रमंडळातील महिला वर्गाचा सहभागही काही कमी नसतो. मोदक तेही सोवळ्याने करायचे काम महिला मंडळ करत असे. त्यांच्यातील एकोपा वाखाणण्याजोगा. नकळत या छोट्या कृतीतून काय घेत गेलो हे आता कळते. छोट्या कलाकारांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात माझा सहभाग मी नोंदवित असे.

लग्नानंतर संपर्क कमी होत गेला; पण बालपणी त्या गणेशोत्सवात सातत्याने दिलेले योगदान आज आवर्जून आठवले. वरच्या आळीतील त्या गणेशोत्सवाच्या मांडवात केलेली मस्ती वयाच्या या टप्प्यावरही डोळ्यांत आनंदाश्रू आणते. हेच यश त्या आठवणीतल्या माझ्या मित्रमंडळाचे आहे का? लोकमान्यांनी एकोपा संघटनसूत्र हा उद्देश ठेवून चालू केलेला हा मनामनाला जोडणारा गणेशोत्सव मी खऱ्या अर्थाने लहानपणीच अनुभवला. नंतर मात्र ते दिवस अनुभवता आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: 24 विभागांत विभागलेली मुंबई; एकूण वॉर्ड किती? कारभार सोपा की गुंतागुंतीचा? पाहा मुंबई महापालिका निवडणुकीचं संपूर्ण गणित

पाकड्याची लाज गेली! BBL पदार्पणात Shaheen Afridi ला गोलंदाजी करण्यापासून रोखले; अम्पायरने कान टोचले, नेमके काय घडले? Video

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

Latest Marathi News Live Update : मेस्सीच्या दिल्ली दौऱ्याला धुक्याचा फटका; इतर कार्यक्रम रद्द करून थेट स्टेडियममध्ये होणार कार्यक्रम

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

SCROLL FOR NEXT