Vedamurthy Rabindra Paithne esakal
मुक्तपीठ

समृद्ध वेदपरंपरेला कृतज्ञतेचा नमस्कार

सकाळ वृत्तसेवा

"नाशिक येथील महर्षी गौतमी-गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान, दक्षिणाम्नायश्री श्री जगद्‍गुरू शंकराचार्य महासंस्थान शृंगेरी, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकतर्फे नाशिकमध्ये १३ आणि १४ जुलैला राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद होत आहे. १३ ला पंचवटीत सरदार चौकातील गोपाल मंगल कार्यालयात दुपारी साडेबाराला महापरिषदेला प्रारंभ होईल. १४ ला महापरिषदेचे उद्‍घाटन रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. डॉ. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते होईल. गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार प्रदान सोहळा होईल. त्यानिमित्त समृद्ध वेदपरंपरेला कृतज्ञतेचा नमस्कार..."- वेदमूर्ती रवींद्र पैठणे, निमंत्रक, महापरिषद

(marathi article on ravindra paithane Salutations of gratitude to rich Vedic tradition nashik)

नाशिकच्या पुण्यभूमीत ही महापरिषद आयोजित करताना धन्यता वाटते आहे. या परिषदेत वैदिक संहिता, जनसंज्ञापन व संतांची वेदनिष्ठा या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.

त्यात प्रा. हरेराम त्रिपाठी, वेदशास्त्रसंपन्न गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी, वेदांतरत्न प्रमोदशास्त्री कुलकर्णी, स्मार्त चुडामणी शांताराम भानोसे सहभागी होतील. ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर परिसंवादाचे संचालन करणार आहेत.

शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी पाचला कुर्तकोटी सभागृहात होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी उपस्थित राहाणार आहेत.

त्यांच्या हस्ते सन्मान वितरित होईल. नाशिककरांनी दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहावे. ज्यांचे वेद परंपरा पुढे नेण्यात मोलाचे योगदान आहे, अशा विद्वानांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरव करण्यात येणार आहे.

यांचा होणार विशेष पुरस्काराने सन्मान

(कै.) भास्कर अण्णा जोशी स्मरणार्थ राष्ट्रीय वेदशास्त्र शिरोमणी पुरस्कार वाराणसीचे गणेश्वरशास्त्री द्रविड यांना प्रदान करण्यात येणार आहे.

धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय ऋग्वेद पुरस्कार चेन्नईचे हरिहरन घनपाठी यांना, नाशिकचे वेदाचार्य श्री शांतारामशास्त्री भानोसे यांनाही यजुर्वेदात गौरीशंकर राष्ट्रीय वेद पुरस्कार, सामवेद पुरस्कार बंगळूरचे मानव मिश्रा यांना, अथर्ववेद पुरस्कार जालन्याचे दिनकर जोशी यांना प्रदान करण्यात येतील.

संस्कृत सेवाव्रती राष्ट्रीय पुरस्कार रामटेकचे मधुसूदन पेन्ना, नाशिकच्या वैशाली वैद्य यांना देण्यात येणार आहेत. वेदमूर्ती (कै.) नंदकुमार हरदास वेदवेदांग पुरस्कार नाशिकचे अभयशात्री पाठक व वैदिक छात्र पुरस्कार नाशिकच्याच वेदमूर्ती सौरभ पाठक यांना देण्यात येतील. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू मधुसूदन पेन्ना हे सुवर्णपदकाचे मानकरी आहेत. वेदांत तत्त्वज्ञान व योगशास्त्राचे बहुमूल्य संशोधन त्यांनी केले. दोन महाकाव्ये, १० लघुकाव्ये, ३० अनुवाद व १४० संपादित ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहेत.

गुलाबराव महाराजांवरील त्यांच्या महाकाव्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. देशभरातून विविध पुरस्कार त्यांना मिळाले असून, परदेशात त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

बंगळुरूचे मानस मिश्रा हे सामवेद विद्वान म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी नगरच्या क्षीरसागर महाराज पाठशाळेत शिक्षण घेतले आहे. श्रृंगेरी, आंध्र प्रदेश येथे वेदशात्राचे उच्चशिक्षण त्यांनी घेतले असून, विविध सभासंमेलनांतील चर्चांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

जालन्याचे दिनकर जोशी यांचे कर्नाटकात दशग्रंथ अध्ययन झाले असून, ते संस्कृत, अथर्ववेद व कर्मकांडाचे अध्यापन करतात. त्यांना सुवर्णपदकासह विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. श्री समर्थ वेदविद्यालय व श्री दत्तधाम येथे ते अथर्ववेदाचे अध्यापन करतात.

प्रमोदशास्त्री कुलकर्णी हे परभणीचे असून, अद्वैत वेदांतशास्त्र, ऋग्वेद, न्याय, ज्योतिष, साहित्य यांचा गाढा अभ्यास आहे. कांची, म्हैसूर, मुंबई, पुणे येथे त्यांनी पदवीसह सुवर्णपदक आणि विविध सन्मान मिळविले आहेत. त्यांची अनेक बहुमोल पुस्तके प्रकाशित झाली असून, स्वतःच्या वेदांतभवन आचार्य वेदशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

नाशिकचे शांतारामशास्त्री भानोसे हे दशग्रंथांचे मर्मज्ञ अभ्यासक व घनपाठ पारायणाचे वैदिक विद्वान म्हणून सुपरिचित आहेत. स्मार्त चुडामणी ही सर्वोच्च पदवी त्यांनी प्राप्त केली असून, देश-विदेशातील यज्ञयागांचे आचार्यपद ते भूषवितात. विविध दुर्मिळ ग्रंथांचे त्यांनी ध्वनिमुद्रण केले आहे.

अभय भगवान पाठक हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील असून, तीन वर्षांपासून नाशिक येथील श्री दत्तधाममध्ये राहतात. श्री गुरुगंगेश्वरधाम येथे श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संहिता अध्ययन झाले आहे. १६ महिन्यांत त्यांनी गायत्री पुरश्चरण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT