muktapeeth 
मुक्तपीठ

ब्लॅक कॅट

डॉ. गोरखनाथ काळे

त्या अमेरिकन गृहस्थांनी विचारले आणि मी त्यांना उत्तर दिलेही. पण मग मुलाने त्या गृहस्थांनी नेमके काय विचारले होते ते सांगितले, तेव्हा ते गृहस्थ माझ्याकडे शंकीत मुद्रेने पाहात का गेले, ते कळले.

मी आणि माझी पत्नी आमच्या मुलाकडे अमेरिकेत सॅन होजेला गेलो होतो. एके दिवशी सकाळी मी बंगल्याच्या पुढील अंगणात फुलांची रोपे लावत होतो. त्या वेळी समोरील रस्ता ओलांडून एक काळे मांजर धावत आमच्या बंगल्यासमोर आले. मी कुतूहलाने त्याच्याकडे पाहिले. थोडा वेळ थांबून ते मांजर समोरील पदपथावरून उजवीकडे निघून गेले. इतक्‍यात एका गृहस्थांनी माझ्या समोर येऊन अमेरिकन इंग्लिशमधून मला काहीतरी विचारले. त्यांचे इंग्लिश उच्चार उतके वेगळे होते, की मला ते नीट समजलेच नाहीत. केवळ ‘ब्लॅक कॅट’ हा शब्द तेवढा मला कळला. मला वाटले, की ते मांजर त्यांचे असावे आणि ते कोणत्या दिशेने गेले याबाबतची माहिती त्यांना हवी असावी. मी ते मांजर ज्या दिशेने गेले तिकडे बोट दाखवून तसे त्यांना सांगितले. तरी ते गृहस्थ थोडा वेळ थांबून, काहीशा साशंकतेने माझ्याकडे पाहून निघून गेले.

त्या दिवशी सुटी असल्याने माझा मुलगा व सून घरीच होते. आम्हां दोघांतील संभाषण मुलाने घरातून ऐकले होते. मी थोड्या वेळाने घरात गेल्यानंतर त्याने मला विचारले, की ते अमेरिकन गृहस्थ काय म्हणत होते. मी त्याला सांगितले, की ते म्हणत होते, ‘‘समोरील रस्ता ओलांडून एक मांजर इकडे आले होते का? आणि ते कोठे गेले?’’ त्यावर माझा मुलगा हसू लागला. मला काहीच कळेना. त्याला मी म्हणालो, ‘‘अरे हसतोस काय?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘अहो बाबा, ते अमेरिकन गृहस्थ म्हणत होते, की एक काळे मांजर रस्ता ओलांडत असताना एका मोटारीखाली सापडणार होते. थोडक्‍यात वाचले. ते मांजर तुमचे आहे का?’’ त्यानंतर सर्व प्रकार माझ्या लक्षात आला आणि आम्ही सर्वजण हसू लागलो.

अमेरिकन लोकांचे इंग्लिश उच्चार वेगळे असतात. त्यामुळे ते बोलतात ते आपणास नीट न समजल्यामुळे, आपण वेगळाच अर्थ घेतो आणि त्यातून निर्माण होतो विनोद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

Arnala Fort History: २२९ वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्यावर कसा साजरा व्हायचा गणेशोत्सव? मोडी कागदपत्रांतून ऐतिहासिक रहस्य उलगडलं

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Ujani Water Crisis : उजनी परिसरातील वीज दोन तासांवर आणण्याच्या हालचाली ; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

SCROLL FOR NEXT