jyoti-godbole 
मुक्तपीठ

आई आणि शिकेकाई 

डॉ. ज्योती गोडबोले

लंडनला प्रथमच चाललेली वर्षा भेटायला आली होती. मुलगी गेली  ७-८ वर्षे लंडनला आहे. यंदा वर्षा तिच्याकडे चालली होती. सगळी तयारी मला दाखवताना तिने अगदी अपूर्वाईने शिकेकाईचे पाकीट दाखवले. मला म्हणाली, ‘‘बघ, किती सुंदर दळून आणलीय मी स्वतः! नागरमोथ्यासह सगळे घातलेय. माझ्या लेकीचे, नातीचे केस फार सुंदर आणि लांब आहेत. छान नाहायला घालीन दोघींना.’’

मी काहीच बोलले नाही. घरी आले तरी ती सुगंधी शिकेकाई मनातून जाईना. लहानपणी आमची आई अशाच शिकेकाईने दर रविवारी न्हाऊ घालायची. शिकेकाईत नाना वस्तू घालून ती स्वतः गिरणीतून दळून आणायची. माका, ब्राह्मी आवळा घालून हिरवेगार तेलही ती घरीच करायची. रविवारचे न्हाणे हा मोठा कार्यक्रम असायचा. कडकडीत पाण्याने ती आम्हा बहिणींना न्हाऊ घालायची. खसाखसा केस पुसायची आणि दुपारी केस वाळले की त्या थंड हिरव्यागार तेलाने केसांना मालीश करून सुंदर वेण्या घालायची. गुंगीच यायची त्या सोहळ्याने. आता वर्षा नातीला कसे न्हाऊ घालते, याची उत्सुकता वाटायला लागली. ठरल्यावेळी वर्षा भारतात परतली. काही दिवसांनी मी भेटायला गेले. ते शिकेकाईचे पुडके टेबलावरच पडले होते. न उघडता तसेच! मी विचारले,‘‘ काय गं, हे वापरले नाहीस का?’’ ती म्हणाली, ‘‘नाही गं बाई! काय सांगू तुला, नातीला कौतुकाने विचारले तर म्हणाली आजी प्लीज! या असल्या पावडरने मी केस वॉश करणार नाही. माझा वेगळा शाम्पू असतो. सॉरी, पण या पावडरने माझा बाथटब किती खराब होईल गं! मुलीने तर बॉयकटच केलाय. नातीला दुजोरा देत ती म्हणाली, ‘‘आई, कसली शिकेकाई न कसले गं न्हाणे ते! आत्ताच घर रिनोव्हेट केलेय. याचे कार्पेटवर डाग पडले तर नुसता मनस्ताप होईल. म्हणूनच हे बापडे पुडके आले परत.

मी म्हटले, ‘‘सखे रुसू नको, रागावू नको. खिन्न होऊ नको. पुढच्या महिन्यात जाणारेस ना आदिवासी कॅंपला? तिकडे दे हे. अगदी योग्य स्थळी पडेल ही शिकेकाई.’’ वर्षाच्या चेहऱ्यावर आनंद दाटला. लंडनचा प्रवास करून आलेली शिकेकाई ठाण्याजवळच्या आदिवासी पाड्यात सुखासमाधानाने रवाना झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: ४८ वरून थेट १०८..., कल्याण-मुरबाड मार्गावर एसटी फेऱ्यात वाढ, प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकानंतर नीरज चोप्रा पुन्हा मैदानावर... अर्शद नदीमसह पथिरागेचा हिशोब करणार...

Pimpri Hotel: चार घास खाल्ले अन् धक्का बसला! निगडीतील नामांकित हॉटेलच्या पावभाजीत जिवंत अळी; ग्राहकांनी व्यक्त केला संताप

Marathi Live Updates News: विरोधी पक्षाला लोकशाही बळकट करायची असेल, तर त्यांनी चर्चा केली पाहिजे - भाजप खासदार पी. पी. चौधरी

'आमची एवढी चांगली मैत्री होती ती संपली' सतीश पुळेकर नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाले, 'मला माफ करा हा विषय..'

SCROLL FOR NEXT