muktapeeth 
मुक्तपीठ

फिटे अंधाराचे जाळे!

गिरीश जाधव

माळावरच्या पालावर एक दिवा लावून आलो आणि तेथील अंधार किलकिला झाल्याचा अनुभवही घेतला.

पंधरा वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कंत्राटी पद्धतीवर नोकरीस होतो. विद्यार्थी-विद्यार्थिनींना मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची माहिती देणे, माहितीपुस्तिकांची विक्री करणे, असे माझे काम होते. माझा कंत्राटाचा कालावधी संपत आला होता. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर जाऊन परीक्षा साहित्य नेऊन द्यायचे होते. मी सोलापूरला पोचलो तेव्हा रात्र झाली होती. एका मैदानात मला भटक्‍यांची पाले दिसली. मी त्या रात्री या पालांवर मुक्काम केला. रात्री एक वाजेपर्यंत येथील मुलांबरोबर शिक्षणावर बोलत राहिलो. मुलेसुद्धा फार आनंदाने माझे बोलणे ऐकत होती. नंतर या मुलांच्या पालकांना मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारी परीक्षेची माहिती दिली. पाचवी-सातवी नापास मुलांना ही पूर्वतयारीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करता येते. हे प्रमाणपत्र नोकरीसाठीही उपयोगी पडते. या मुलांना ही माहिती देऊन सकाळी मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघून गेलो. विद्यापीठाची नोकरी सुटूनही आता पंधरा-सोळा वर्षे झाली.

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून चालत चाललो होतो. अचानक एक तरुण माझ्यासमोर आला. म्हणाला, ‘‘मला ओळखलं का?’’ माझ्या काही लक्षात येईना. तोच म्हणाला, ‘‘नाही आठवणार. पंधरा वर्षांपूर्वी अचानक आमच्या पालावर आला होता. त्यावेळीच ठरवलं, शिकायचं.’’ संपत रामदास मोरे यांनी सांगोल्यातील केंद्रावर पूर्वतयारीची परीक्षा दिली. या पूर्वप्रमाणपत्रावर एका संस्थेमध्ये त्याला नोकरीसुद्धा मिळाली. नोकरी करत त्याने मुक्त विद्यापीठातून मराठी या विषयात पदवी मिळवली. याच विद्यापीठातून पत्रकारितेमध्ये त्याने एम.ए. केले. आता तो सांगोल्यात नोकरी करून एक साप्ताहिकही चालवतो. संपतला भेटल्यावर मला खूपच आनंद झाला व त्याचा मला खूप अभिमान वाटला. ओठावर आले, ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा’. येथे तर मी त्या रात्री सोलापूरच्या माळावरच्या पालावर एक दिवा उजळवून आलो होतो, याचा माझा मलाच अभिमान वाटला. असेलही ‘एकच पणती मिणमिणती’, पण तीच माळावरचा, पालावरचा सारा अंधार दूर करील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुण्यात महिलांच्या नावावरील घरांना ५० टक्के करमाफी; भाजपने निवडणुकीत दिलेला शब्द फिरवला

Sleep Crisis in India: भारतीयांची झोप ‘आउट ऑफ ट्रॅक’; बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे धक्कादायक वास्तव समोर

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Ratnagiri Mango Crisis : आंबा शौकिनांना मोठा झटका! यंदा हापूसच्या उत्पादनात 80-90 टक्क्यांची प्रचंड घट; कृषी विभागाच्या अहवालात धक्कादायक आकडेवारी

मालमत्ताधारकांना दिलासा! प्राॅपर्टी कार्डमधील फेरफार ऑनलाइन; ४५ प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल

SCROLL FOR NEXT