muktapeeth
muktapeeth 
मुक्तपीठ

दीदींची शाबासकी

मधुरा दातार

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचा आज नव्वदावा वाढदिवस. अशा वेळी एका उभरत्या गायिकेला आठवतेय त्यांनी दिलेली दाद.

त्या दिवशी आम्ही सगळेच खूप आनंदात होतो. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा ऐंशीवा वाढदिवस होता. षण्मुखानंदचा हॉल खचाखच भरलेला. विनोद तावडे, जावेद अख्तर आणि लतादीदी कार्यक्रमाला उपस्थित. लाडक्या भावाचा वाढदिवस म्हणून दीदी वेळेच्या खूप आधीच हजर झालेल्या. सगळ्यांचे सत्कार झाले आणि मग बॉलिवूडच्या लोकांचा गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. रात्री साडेदहाला मी आणि राधा गायला बसलो. फक्त अर्धा तास आम्हां दोघींना गाण्यासाठी देण्यात आला होता. मी पंडितजींच्या आवडीची, पूर्व दिशेला, तरुण आहे रात्र अजुनी आणि शेवटी पंडितजींनी शिकवलेली ‘जिवलगा’ची मूळ बंदिश आणि त्याला जोडून ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ सादर केले. तिन्ही गाण्यांना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रम संपला. कौतुक झेलत जरा बाजूला झाले तर विंगमधून उषाताई आणि मीनाताई मला खुणा करत होत्या. म्हणाल्या, ‘‘आत चल. दीदी बोलावते आहे.’’ मी खूप घाबरले. मुळात पाच वाजता आलेल्या दीदी रात्री अकरापर्यंत असतील ही कल्पनाच नव्हती. मला वाटले, माझे गाण्यात काहीतरी चुकले. मी घाबरतच आत गेले. उषाताई आणि मीनाताई म्हणाल्या, ‘‘दीदी, ही घे मधुरा.’’

दीदीनी मला जवळ घेतले आणि माझे हात घट्ट धरून ठेवून म्हणाल्या, ‘‘फार छान गायलीस तू, खूप छान. विशेष करून - ‘जिवलगा’. खूप मोठी हो!’’ आणि पर्समधून काही नोटा माझ्या हातात ठेवून म्हणाल्या, ‘‘आत्ता माझ्याकडे आहे ते मी सगळे तुला देते आहे.’’ मला काय बोलावे ते सुचतच नव्हते, डोळ्यांतून अखळ जळ केवळ. कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशी ती अविस्मरणीय भेट होती. त्यांनी एका नोटेवर मला सही दिली, ती नोट मी देवघरात जपून ठेवली आहे. त्यांनी तिथे त्यांच्या माणसाला सांगून सर्व मंगेशकर कुटुंबीय आणि मी असा फोटो काढायला सांगितला. ही आठवण मनात कायम राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT