muktapeeth 
मुक्तपीठ

झाड जगावे!

पंकज कुलकर्णी

त्याच त्या खड्ड्यात दरवर्षी वृक्षारोपण करून त्याची छायाचित्रे प्रसारित करण्यात धन्यता मानू नका. झाडे जगवा.

पावसाळ्याच्या सुरवातीच्या महिन्यात टेकड्यांवर मोठे उत्साहाचे वातावरण असते. विद्यार्थी, संस्था, मंडळे रोपे घेऊन येतात. वृक्षारोपणाचा कार्यक्रम जल्लोषात साजरा होतो. रोपे इतकी छोटी असतात, कसे तरी खड्डे खणले जातात, कधी कधी प्लॅस्टिकच्या पिशवीसह रोप कोंबायची घाई असते. रोपे लावताना छायाचित्र काढून, सेल्फी घेऊन ते पोस्ट करणे महत्त्वाचे असते. रोप लावल्याचे समाधान मिळते खरे; पण ते वाढवण्याचा आनंद कसा मिळणार? वेताळ टेकडीचे उदाहरण पाहू. सकाळ-संध्याकाळचे पाच-सहा तास सोडले तर टेकडीवर वर्दळ एकदम कमी असते. या मधल्या काळात खूप काही घडामोडी होत असतात. गवत हिरवे आहे तोपर्यंत गुरे चरण्यासाठी येतात. रोपांना हलवून जातात, झाडे वाळली की लाकूडफाटा गोळा करणारे असतात. त्याबरोबर असेल त्या वस्तूंच्या चोऱ्याही होतात. पाण्यासाठी दोन तळी केली होती, त्याचे चांगले कापडही काढून नेले. संध्याकाळनंतर चूल पेटवून पार्ट्या होतात. त्यामुळे टेकडीवर वणवा लागून खूपच नुकसान होते. वाढलेली रोपे होरपळून जातात. ही रोपे जगवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. मागील वर्षी अशी चाळीस रोपे मला परत घरी आणावी लागली. शिल्लक राहिलेल्या त्या दोन इंच काडीलाही पुन्हा पालवी फुटली. चार-सहा रोपांचा अपवाद सोडला तर बाकीची रोपे दोन वर्षांत पुन्हा चार फूट वाढली आणि ती या वर्षी पुन्हा लावली.

टेकडीवर किती तरी वर्षे त्याच त्याच ठिकाणी वृक्षारोपण सुरू आहे, हे त्या कामाचे यश मानायचे का? टेकडीवर नियमित फिरायला येणाऱ्यांपैकी काहीच जण स्वतः लावलेल्या रोपांची वर्षभर काळजी घेतात. तर काही जण इतरांच्या रोपांचीही काळजी घेतात. काही आजी-आजोबा चाळीस-पन्नास रोपांना नियमित पाणी देतात. कोणी तरी दुसरेच लावून गेलेले आहेत ती झाडे. टेकडीवर पाण्याची समस्या असताना काही जण स्वतःच्या खर्चाने पाण्याचे टॅंकर आणून रोपांची काळजी घेतात. वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब अशी शंभर रोपे वाढत आहेत. केवळ रोप लावून भागत नाही, ते जगवावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

Uttar Pradesh: UP ATS चा धडाका! देवबंदमध्ये मोठी कारवाई; संशयास्पद व्हिडिओ आणि इराण-पाकिस्तान कनेक्शनची चर्चा

Premium|Artificial Intelligence Investment : एआय गुंतवणुकीतून आयटी क्षेत्राला धक्का; भारतीय कंपन्यांसमोर आव्हान

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

SCROLL FOR NEXT