muktapeeth 
मुक्तपीठ

तगर

शुभदा सप्रे

गंध-रंगांची फुले नसली की देव सजवायला तगरीची फुले उपयोगी येतात. एरवी उपेक्षाच होते त्यांची.

हे दिवस असे असतात, की मोगऱ्याचा बहर संपलेला व पारिजातक अजून बहरात यायचा असतो. पण देवांसाठी तगर बहरलेली. तगर बाराही महिने बहरलेली. त्या तगरीने आजकाल देव सजतात. लाल जास्वंदांच्या मध्ये इतके सुंदर रूप दिसते देवघराचे. वर्षभर फुलणाऱ्या तगरीचा स्वच्छ धवल रंग वैराग्याचा. भरपूर पाकळ्या असलेले तगरीचे फूल लांबून एकदम पांढरे गुलाबाचे फूल वाटते. दुसरे एकेरी पाकळ्यांचे. चांदणीसारखे रात्रीच्या अंधारात ते फारच चमकते. चांदणीसारख्या पाचच पाकळ्या. दोन्ही प्रकारच्या तगरी भरपूर फुलतात. त्याला ना गंध, ना रंग. त्यामुळे तगरीची थोडी उपेक्षाच होते का? पण इतर फुले नसली की त्यानेच देव सजवतात. बाकीच्या वेळेला आयुष्य संपले की गळून पडतात. बिनबोभाट. आपल्याला देवपूजेत अग्रहक्काचा मान नाही म्हणून त्याला खंत नाही. बरे, ती कवींचीही आवडती नाही. माझ्या वाचनात कवी ह. स. गोखले (आठवणीतल्या कविता - भाग 3) यांची तेवढी एकच कविता आली. कवी म्हणतात, "फूल तगरीचे सर्व गुणी साधे, दृष्टी पडता सहज चित्त वेधे'. त्याच्या डेखावर दुधाचा बिंदू आहे. त्यामुळे ते पुष्पसृष्टीचे लहान बाळ आहे, असा अत्यंत सुंदर कल्पनाविलास करतात. शेवटी म्हणतात, असे हे फूल मी देवी शारदे तुला वाहतो. कविता मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

तगरीसारखेच आयुष्य निष्ठावान सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचे असते. वरिष्ठ जो आदेश देतील त्यासाठी तन, मन, वेळप्रसंगी धनाने ते झिजत असतात. संस्थेसाठी पक्षासाठी अहोरात्र तन्मयतेने काम करतात. पण बिचाऱ्याना कधीही मंचावर जाण्याचा मान मिळत नाही. कार्यक्रम असेल तर हटकून या लोकांची आठवण येते. त्यांच्याशी संपर्क साधला जातो. स्वयंसेवकाची भूमिका असल्यामुळे तेही सर्वतोपरी मदत करतात. पु.लं.च्या नारायणासारखी. पण आभार मानायच्या वेळेला संस्थेला त्यांचा विसर पडतो. ते त्याची खंत बाळगत नाहीत. कारण ते खरेच निष्काम कर्मयोग करीत असतात. मला त्यांच्या वागण्यात व तगरीच्या फुलात साम्य दिसते. आपणही सर्वांनी तगरीसारखे आयुष्य जगायचे ठरवले, तर किती चांगले होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Creamy Layer : केंद्र सरकारला झटका ! ओबीसी क्रिमी लेयरवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UPSC सह १८ राज्यांतील भरतीवर परिणाम?

होलसेल बदलामागचं लॉजिक काय? Shahid Afridi ने पाकिस्तान संघाचे वाभाडे काढले; म्हणाला, ट्वेंटी-२० तील खेळाडू कसोटी संघात...

Marathi News Live Updates : यमुना नदीत लष्कराची बोट बुडाली; दोन जवान बेपत्ता, १५ तासांनंतरही शोध सुरू

पहिली बायको असताना दुसरं लग्न केलं, नव्या बायकोला घरी आणलं अन् संतापलेल्या पत्नीने थेट त्रिशूळ उगारला; विरारमध्ये थरार!

MPSC Paper Leak : ...'मग माझा राजीनामा का मागता?' पेपरफुटीवरुन 'एमपीएससी'चे अध्यक्ष विवेक भीमनवारांचे खुले पत्र

SCROLL FOR NEXT