muktapeeth 
मुक्तपीठ

जेवणाची किंमत

नवनाथ लोंढे

भुकेचे महत्त्व व जेवणाची किंमत कळायलाही वेळ यावी लागते. अशा वेळी चटणीभाकरही मिष्टान्नासारखी वाटते.

प्रजासत्ताकदिनी पहाटेच राजगुरुनगरहून वाड्याला गेलो. तेथे ध्वजवंदन झाल्यावर जुन्नरमार्गे ओतुरला पोचलो. तेथील मित्रांशी चर्चा करून सात-आठ जणांसह बदगी बेलापूर गाठले. छोटी बैठकच झाली. मग पुन्हा ओतूर. राजगुरुनगरला घरी पोचेतोवर रात्रीचे आठ वाजले होते. दिवसभरातील पंधरा तासांत सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास एसटी, जीप, बाइकवरून केला. दिवसभरात फक्त दोन कप दूध व थोडी भेळ खाणे झाले होते. दिवसभर न जेवल्यामुळे आता कडकडून भूक लागली होती. या क्षणी साधी चटणीभाकरसुद्धा मिष्टान्नासारखी गोड व रुचकर लागली असती. पण घरात चक्क आवडती पुरणपोळी तयार होत होती. पोटात न मावणारी भूक आणि एकीकडे पुरणपोळीचा खरपूस वास, भज्यांचा खमंग वास भूक अजून वाढली होती.
शेवटी पत्नीची साद आली आणि आम्ही चौघेही गोळ्यामेळ्याने जेवायला बसलो. सर्व पदार्थ ताटात वाढून होईतोवर अधीरता अजून वाढत गेली. मग दिवसभराच्या उपासापोटी भटकंतीची सांगता पुरणपोळीचा आस्वाद घेत झाली.

एक गोष्ट जाणवली. जेवणाचा खरा आनंद घेण्यासाठी जेवणापूर्वी थोडा व्यायाम किंवा शारीरिक कष्ट केलेच पाहिजे. जेवणापूर्वी थोडा वेळ जेवणाची प्रतीक्षा करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, म्हणजे जेवणाचे महत्त्व व त्याची किंमत कळते. पुरेशा कष्टांनंतर काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर जे मिळते त्याचा आनंद, त्याचे समाधान काही वेगळेच असते. कुटुंबीयांसमवेत एकत्र जेवणाचा एक आगळावेगळा आनंद असतो. जीवनात खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर काही अनावश्‍यक गोष्टींचा मोह टाळला पाहिजे. कधीतरी, कशाचा तरी त्याग करायलाही शिकले पाहिजे. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी त्या क्षणाची वाट पाहायला सुद्धा शिकले पाहिजे. आणि निर्भेळ आनंदासाठी शक्‍य असेल तर तशी संधी निर्माण करता आली पाहिजे. आणि महत्त्वाचे या सर्वांसाठी आपण सदैव सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हे सर्व करीत असताना शिस्त पाळलीच पाहिजे. असे केले तर नक्कीच जेवण व जीवन सुखी व समृद्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT