muktapeeth 
मुक्तपीठ

मन करा रे खंबीर

सुरेश गोरे

अगदी तरुण वयात आजाराने गाठले. कायमची औषधे घ्यावी लागणार होती. पण मनाचा निश्‍चय आणि व्यायाम यामुळे त्रासमुक्ती झाली.

मी एका ख्यातनाम कॉर्पोरेट कंपनीत मनुष्यबळ विभागात काम करत होतो. दुपारी जेवणाच्या सुटीची वेळ होती. सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारत जेवण घेत असताना अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधेरी आली. काही समजायच्या आत माझे डोके समोरच्या टेबलावर आपटले. माझ्या सहकाऱ्यांनी त्वरेने ही गोष्ट आमच्या वरिष्ठांना कळवली व मला घेऊन ते कंपनीच्या प्रथमोपचार केंद्रात गेले. तोपर्यंत मी थोडासा भानावर आलो होतो. प्रथमोपचार केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार जोशी व डॉ. नंदकुमार बेके यांनी माझ्यावर त्वरित उपचार चालू केले. थोडी विश्रांती झाल्यावर मला विश्‍वास देत काम सुरू करायला सांगितले. कामाच्या जागेवर गेल्यानंतर त्या दिवशी मला थोड्याशा थकव्याशिवाय विशेष असे काहीच जाणवले नाही. कामावरून घरी गेल्यावर सुद्धा काहीच त्रास झाला नाही. म्हणून मी दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वेळेवर कामावर गेलो. दुपारची जेवणाची सुटी संपेपर्यंत सर्व काही आलबेल होते. नंतर मला पुन्हा अस्वस्थ वाटायला लागले. घरी जाताना वाटेत काही त्रास होण्याच्या शंकेने प्रथमोपचार केंद्रात जाऊन मला होत असलेल्या त्रासाबद्दल दोन्ही डॉक्‍टरांना सांगितले. मी अर्ध्या दिवसाच्या रजेवर जात असल्याचेही त्यांना सांगितले. त्यांनी पुन्हा तपासणी केली. रजेची आवश्‍यकता नसल्याचे सांगत मला पुन्हा कामासाठी पाठवले. पण पुन्हा तशाच स्वरूपाचा त्रास जाणवू लागल्याने, तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे तपासण्यासाठी पाठविले. मग विविध तपासण्या, औषधपाणी सुरू झाले. तरुणपणीच औषधे कायमची मागे लागली. ठरवले, या त्रासावर मात केलीच पाहिजे. मनाने खंबीर बनणे हाच उपाय होता. दोन्ही डॉक्‍टरांनी पाठिंबा दिला. आम्ही पाठीशी आहोत, असे सांगून त्यांनी हळूहळू औषधांचे प्रमाण कमी करत नेले. जोडीला रोज करत असलेल्या व्यायामाबरोबरच चालण्याचा व्यायामही सुरू केला. औषधे कमी केल्यावर सुरवातीला थोडासा त्रास जाणवायचा. पण निश्‍चयापासून मागे हटायचे नाही असा निर्धार होता. धीर देण्यासाठी डॉक्‍टरांची साथ होतीच. हळूहळू त्रास खूपच कमी झाला आणि औषधे पूर्णपणे बंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT