Kalpana-Jakhade 
मुक्तपीठ

समंजसपणा

कल्पना जाखडे

मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा कौतुक सोहळा काहीजण डोळाभर पाहतात, काहींच्या डोळ्यांत कौतुकाचा सोहळा असतो.

नुकत्याच शाळा सुरू झाल्या. सर्व जण आपापल्या मुलांना नव्या शाळेत घालून नवे दप्तर, युनिफॉर्म, टिफीन बॅग आवर्जून घेऊन शाळेत सोडायला येतात. कौतुक सोहळा डोळाभर बघतात. जे मला मिळाले नाही ते सारे काही माझ्या मुलाला मिळो म्हणून धडपडतात. त्यातलीच स्नेहा, मात्र थोडी वेगळी. खरे तर इतर कामवाल्या ताई-बाईंचे प्रतिनिधित्व करणारी. काम करता करता म्हणाली, ‘‘काकू, आज शाळा सुरू झाल्या ना! माझी विद्याबी शाळंत गेली. लई मस्त वाटतंय. छान छान कपडे, दप्तर, वॉटरबॅग घेऊन शेजारच्या काकूबरोबर शाळेत गेली. मी ठरवलय, विद्याला खूप शिकवायचं. माझ्यासारखे काम नाही करू देणार.’ ‘अगं, पण तू का नाही गेलीस तिला सोडायला? आज सुटी घ्यायची होती.’

‘तिचा बा मजुरी बुडंल म्हणून खाडा नाही करू शकत. मोठा पोरगा गेला पेपर लाइनला. मंग शाळेत जाणारं. खरं सांगू का काकू, झाली सवय याची. माझी विद्या लईऽऽ समजूतदार हाय. या महिन्यात खर्च खूप असतो; पण आपला गेल्या वर्षीचा युनिफॉर्म, दप्तर, डब्याची पिशवी आपण वापरायची बरं का?

पुढच्या वर्षी नक्की घेऊ.’’ म्हणते, ‘‘चालेल, पण मम्मे मला शाळा लई आवडते. टीचर छान असत्यात. नसू देत नवा युनिफॉर्म; पण पुढच्या वर्षी नक्की बर का मम्मे.’’ ‘‘काकू, मी गेल्या वर्षीचा विद्याचा युनिफॉर्म धुऊन गादीखाली ठेवला. दप्तर स्वच्छ करून पेपरात गुंडाळून ठेवले. आता उन्हाला ठेवलं होतं. रिबन धुऊन गॅसवर भांड गरम करून रिबनीवर फिरवलं. त्यापण नव्यासारख्या झाल्या. आता बघा विद्या साळंतनं आली का समद्यास्नी शाळेत काय झालं ते सांगत बसेल. दिवसभर शाळा आन टीचर. मी तर दोघास्नी बी सांगते, लोक मदत करतात; पण त्ये जपून वापरायचं आन त्यांना इसरायचं नाही.’’ समाधानाने कसे जगावे, याचाच धडा होता हा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT