Mandar-Sabale
Mandar-Sabale 
मुक्तपीठ

मित्राची एक्झिट

मंदार साबळे

मित्र जातो तेव्हा केवळ तो जात नाही, तर आपल्या आयुष्यातील बरेच काही आपण गमावतो.

महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात असताना एक जुना कॅमेरा घेऊन छायाचित्रण करू लागलो होतो. एक दिवस ‘सकाळ’मध्ये नगरच्या एका अमित नावाच्या तरुणाने  दुर्बिणीच्या साह्याने काढलेले चंद्राचे छायाचित्र प्रसिद्ध झालेले पाहिले. त्याने हे छायाचित्र कसे काढले असेल याचे कुतूहल जागे झाले. त्याला भेटण्याची ओढ लागली. एकाकडून अमितचा दूरध्वनी क्रमांक मिळाला. त्याच्या घरी गेलो. त्याच्याकडे घरी हाताने बनवलेली एक सहा इंची दुर्बीण होती. तिला कॅमेरा जोडून छायाचित्रे कशी काढली याची माहिती त्याने दिली. त्याच्या भेटीनंतर माझे खगोलप्रेम वाढू लागले.

आमच्या भेटी वारंवार होऊ लागल्या आणि आम्हाला नकळत आमची घट्ट मैत्री झाली. अमित मला नेहमीच श्रीमंत किंवा पेशवे म्हणायचा.

दिनेश या मित्राच्या संकल्पनेतून आम्ही ‘भास्कराचार्य अस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटर’ ही संस्था सुरू केली. त्या माध्यमातून आम्ही विविध शाळांत जाऊन खगोलशास्राची माहिती देणाऱ्या कार्यशाळा घेऊ लागलो. अमितही यात खांद्याला खांदा लावून काम करत होता. जयंत नारळीकर, मोहन आपटे, श्रीनिवास औंधकर यांच्यासारख्या दिग्गज शास्त्रज्ञ मंडळींना नगरमध्ये आणले. आमचा एक मोठा ग्रुप तयार झाला. रामेश्वर व बिहार येथे आम्ही सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोबत गेलो होतो. अमितचा खगोलशास्राचा अभ्यास दांडगा होता. नंतर नंतर अमित व इतर सगळे मित्र कामानिमित्त पांगले.

तसे संस्थेचे काम कमी झाले. अमित सीएचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला गेला. त्यामुळे आमच्या भेटी कमी झाल्या. भिंगारवाला चौकात रोज रात्री भरणाऱ्या चौपाटीवर मिळणारे गरम दूध अमितला फार आवडायचे. नगरला आल्यावर तो रात्री हमखास दूध प्यायला यायचा. तेव्हा आमची नक्की भेट व्हायची. असा हा आमचा खगोलप्रेमी हरहुन्नरी मित्र अमित गावडे नुकताच आमच्यातून निघून गेला. त्याची ही एक्झिट मनाच्या गाभाऱ्यात पोकळी निर्माण करून गेली ती आता कायमचीच... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT