Mansi-Bapat 
मुक्तपीठ

दान रद्दीचे अमोल!

मानसी बापट

रद्दी म्हटले तर घरातील अडचण. वेळच्या वेळी निपटाराही करता येत नाही. मग साचत जाते; पण या रद्दीचे दान करता येते.

आपण अनेकदा आपल्या अवतीभवती, रस्त्यावर, अनाथाश्रमात हृदय पिळवटून जाईल अशी दृश्‍ये पाहतो आणि मग डोक्‍यात विचार येतो, की आपण यांच्यापेक्षा किती सुखी आहोत. पण बघितलेली दृश्‍ये काही केल्या आपल्या विचारातून जात नाहीत. मग बरेच जण आपापल्या परीने जशी झेपेल, सुचेल तशी मदत करतात. मदत करायची इच्छा असते, पण कोणाला आणि काय मदत द्यायची असाही प्रश्‍न उभा राहू शकतो. मग कुणी ती मदत आपल्या घरी काम करणाऱ्या मावशींना असो, वॉचमनकाकांना असो अगर एखाद्या संस्थेला असो, करतात. 

मध्यंतरी आमच्या सोसायटीमध्ये ‘स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे’ उपाध्यक्ष एम. डी. देशपांडे आले होते. त्यांनी एका वेगळ्या दानाची कल्पना आम्हाला दिली. अन्नदान, गोदान, रक्तदान, देहदान इत्यादी दानांबद्दल ऐकून होते; पण त्यांनी आणखी एक दान यात जोडले, ते म्हणजे रद्दीदान. खरे तर घरात साठलेली रद्दी वेळच्या वेळी काढून टाकणे हे एक कामच होऊन जाते; पण येथे तर दुहेरी फायदा. घरातली रद्दीच दान करायची. महिन्यातून एक दिवस त्यांचे कार्यकर्ते येतात आणि तोवर जमा झालेली रद्दी घेऊन जातात. ही रद्दी विकून आलेल्या पैशातून दहावी झालेल्या गरजू मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवल्या जातात. ही मदत त्यांना बसपास, महाविद्यालयाचे-वसतिगृहाचे शुल्क, खाणावळीचे पैसे, वह्या-पुस्तके यासाठी दिली जाते. ‘रद्दीतून शिक्षणास मदत’ हा प्रकल्प गेली आठ वर्षे सुरू आहे. अनेक सोसायट्यांमधे धूळ खात पडलेल्या सायकलीही दान स्वरूपात घेऊन त्यांची दुरुस्ती करून आदिवासी पाड्यांवरील गरजू मुला-मुलींना दिल्या जातात. त्या मुलांची रोजची पायपीट थांबते आणि तोच शाळेचा रस्ता त्यांना अधिक जवळचा वाटू लागतो. आपण गरजू मुलांपर्यंत थेट पोचू शकूच असे नाही; पण घरातल्या रद्दीच्या रूपात का होईना आपल्या मदतीचा हात त्या मुलांपर्यंत पोचू शकेल. रद्दीचे मोल खूप आहे, असे मला तरी वाटू लागले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

SCROLL FOR NEXT