Pradeep-Joshi 
मुक्तपीठ

आनंदवारी

प्रदीप जोशी

एक दिवस पालखीबरोबर चालायचे. वारकरी होऊन वारकऱ्यांत मिसळायचे. वय विसरायला होते. ती आनंदऊर्जा पुढे कितीएक दिवस पुरते.

‘माउलीसेवा’ हा सेवाभावी कार्यकर्त्यांचा एक समूह. वारी सुरू झाल्यावर साधारणतः पहिल्या शनिवारी किंवा रविवारी या गटाकडून एक दिवसाची आनंदवारी घडवली जाते. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या आनंदवारीत साडेचारशे जण सहभागी झाले होते. त्यांपैकी साधारण शंभर जण नवीन म्हणजे पहिल्यांदाच आले होते. गेल्या रविवारी सासवड ते जेजुरी अशी अठरा किलोमीटर पालखीबरोबर वाटचाल केली. पहाटेच पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून बसगाड्या निघाल्या. पालखी सासवडहून निघताना आम्ही पोहोचलो. वारीच्या मार्गाची आणि जेजुरीत वारीनंतर कुठे एकत्र जमायचे, याची माहिती प्रत्येकाला देण्यात आली होती. अल्पोपाहार, दुपारच्या भोजनाचा डबा आणि बिसलेरी पाण्याची बाटली गाडीतच देण्यात आली. जे पूर्णवेळ चालू शकणार नाहीत अशांसाठी एका वेगळ्या बसमध्ये व्यवस्था होती.  

पालखीबरोबर सगळ्यांना एकत्र चालणे केवळ अशक्‍य होते. प्रत्येकाने सोयीचा गट बनविला. साऱ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या, खंडेरायाच्या जेजुरीनगरीत माउलींच्या पालखीने संध्याकाळी प्रवेश केला. भंडाऱ्याची मुक्त उधळण केली गेली. सारा परिसर सोन्यासारखा पिवळाधमक झाला. टाळ-मृदंगांच्या तालावर विठुनामाचा गजर आणि येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झाले. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गाड्या पुण्याकडे निघाल्या. डोळे मिटले तरी सतत वारकऱ्यांचे न थकणारे पाय दिसत होते. पुण्यात पोहोचल्यावर सगळ्यांना गरमागरम खिचडीचा डबा देण्यात आला. या वर्षी वृक्षपालकत्व योजना राबविण्यात आली. या वेळी सगळ्यांना एक झाड दत्तक देण्यात आले. आम्ही सर्व त्याचे पालक झालो. एका झाडाचे पालकत्व एका व्यक्तीकडे असेल. झाडाच्या वाढीची माहिती दरमहा द्यायची. एखादे झाड जगले नाही, तर तेथे दुसरे झाड लावण्यात येईल. म्हणजे यंदा साडेचारशे झाडे जगवली जातील. या आनंदवारीचा कोणताही खर्च मागितला जात नाही. एक पेटी फिरविण्यात येते. त्यात स्वेच्छेने पैसे टाकायचे. ही जमा झालेली सर्व रक्कम सार्वजनिक कार्याकरिता खर्च केली जाते. दिवसभर वारी अनुभवून घरी गेलो; पण मनात हरिनामाचा गजर सुरूच होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Reservation: महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेत ट्विस्ट? जुनी पद्धत बदलणार? 'या' तारखेला जाहीर होणार आरक्षण

Lonand politics: लाेणंदेचे डॉ. नितीन सावंत भाजपमध्ये दाखल; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती

Emotional Viral Video : कष्टाचं चीज केलं ! मुलाची सीआरपीएफमध्ये निवड, भाजीविक्रेत्या आईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Nanded Accident : खासगी बस उलटल्याने ४८ ‘होमगार्ड’सह ५० जखमी; पुणे, पिंपरी-चिंचवडहून परतताना अपघात

'मला या घरात आता राहयचं नाही' राकेश आणि अनुश्रीमध्ये बेडवरुन कडाक्याचं भांडण, खरंच राकेश घराबाहेर जाणार?

SCROLL FOR NEXT