मुक्तपीठ

चालावे समुद्री ! (मुक्तपीठ)

अंजली काळे

सागरी सृष्टी निरखण्यासाठी देशविदेशात समुद्रपर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, पण समुद्रात पायी फिरत पाण्याखालील नजारा पाहण्याची कल्पना काही औरच! गुजरातमधील पिरोटन बेटाच्या "सी-वॉक'ची दुर्मिळ संधी आमचे परममित्र राजीव पंडीत यांच्यामुळे चालून आली. खरे तर या बेटावर जायला बंदी आहे. केवळ अभ्यासक विशेष परवानगीने जाऊ शकत होते.

आता त्यांना जाणेही कठीण झाले आहे. तिथे जाण्याचा प्रवासही काहीसा थरारक होता. आधी बोटीतून एका छोट्या बेटावर जाऊन बोट बदलली नंतर दीड तासाच्या जलप्रवासानंतर. या मोठ्या बोटीतून छोट्या बोटीत जायचे होते, पण ते भर समुद्रात! दोन्ही बोटी जवळ आणल्या. त्या हेलकावत असतानाच अचूक वेळ साधून या बोटीतून त्या बोटीत उडी मारायची होती. धडधड वाढली, पण मारली एकदाची उडी! 

"पिरोटन'ला पोचल्यावर ओहोटी सुरू झाली होती. खाजणात सर्वत्र "पिलुडी'ची झुडपं होती. त्याची फळे खायला गुलाबी मैना व पांढऱ्या गालाचे बुलबुल यांची धांदल चालू होती. येतानाही रोहित, गल्स, टर्नस्‌ यांचे थवेच्या थवे दिसले होते. आम्हाला समुद्रात तीन किलोमीटरपर्यंत जायला परवानगी होती. "सी वॉक' चालू केल्यावर सुरवातीला घोट्यापर्यंत पाणी होते. अत्यंत पारदर्शक! बरोबर चालताबोलता ज्ञानकोष रूपेश बलसारा असल्याने या अनोख्या सृष्टीची डोळस सैर घडली. कॉरल्सचे अक्षरशः असंख्य प्रकार होते. स्पॉंज, ट्यूलिप, स्टार, डायमंड, ब्रेन; तसेच कार्पेट ऍनिमोन, ऑक्‍टोपस, सी हॉर्स, स्टोन क्रॅब्र, स्पायडर क्रॅब, स्टारफिश, पफरफिश यांना प्रत्यक्ष अगदी जवळून पाहताना फारच भारी वाटले. एव्हाना पाणी कमरेपर्यंत वाढल्याने बरेच जण मधूनच परत फिरले होते, पण ही संधी पुन्हा येणे नाही. म्हणून आम्ही शेवटपर्यंत रूपेशची पाठ सोडली नाही.

समुद्राच्या "रत्नाकर' नावाची यथार्थता पटली. परतताना पुन्हा मध्ये खोल समुद्रात बोट बदलण्याचे दिव्य होतेच. पिरोटनच्या या पदभ्रमणाने आमच्या अनुभवविश्‍वात मोलाचे स्थान पटकावलेच, पण भोवतालच्या सजीव सृष्टीकडे पाहण्याची एक नजर दिली !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : ८ चौकार, ८ षटकार... रोहित शर्माने झळकावले खणखणीत शतक; ७ वर्षांनी परतला अन् वादळासारखा घोंगावला...

MP Supriya Sule : लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, महाविकास आघाडी-राष्ट्रवादीसमवेतच निवडणूक लढण्याचा प्रयत्न

Fadnavis on Thackeray Unity : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीस काय म्हणाले? 'ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचा'

VIJAY HAZARE TROPHY : पहिली धाव अन् विराट कोहलीच्या नावावर मोठा पराक्रम; सचिन तेंडुलकरनंतर असा विक्रम करणारा भारतीय

BMC Election: शरद पवारांच्या पक्षाने फुंकली ‘तुतारी’! महापालिकांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

SCROLL FOR NEXT