muktapeeth 
मुक्तपीठ

क्षणिक विराम

सीना गरसोळे

जीवन प्रवाही आहे खरे, पण त्यात थोडे थोडे थांबेही हवेत. पुढच्या प्रवासाला सुरवात करण्याआधीचे क्षणिक विराम.

"गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?' विचारल्यावर तिने "न्हाय' म्हटले आणि अगदी शेवटी "हाय' म्हणण्याच्या अगोदर क्षणिक विराम अर्थात "पॉज' घेतला आहे. आता या पहिल्या "न्हाय'च्या नंतरचा हा छोटा "पॉज' हा तिच्या मनातला "होय' व "नाही'च्या द्वंद्वानंतर शेवटी मनातला पक्का विचार ठरतो. मग ती होकार भरते. या पॉजमध्ये मनातली उत्सुकता ताणली जाते.

जीवनातदेखील "पॉज'ला खूप अर्थ आहे. पॉज घेऊन दुसरी गोष्ट केली तर पहिल्या गोष्टीला बळकटी येते आणि दुसऱ्या गोष्टीला "स्पेस' मिळून ती प्रगतीकडे नेणारी ठरते. भाषण करताना किंवा रोजच्या व्यवहारात बोलतानाही पॉज घेतला, की पहिल्या वाक्‍यातला अर्थ लोकांपर्यंत पोहोचतो आणि दुसऱ्या वाक्‍यासाठी, बोलणाराही चिंतन करून पुढचे वाक्‍य बोलण्यास तयार होतो. "पॉज' हा मनातला विचार, चिंतन करण्यासाठी असतो. प्रत्येक वक्‍त्याची बोलण्याची विशिष्ट शैली असते, कोणी थोडाही विराम न घेता मनातले विचार भराभर व्यक्त करतो, तर कोणी बराच वेळ "पॉज' घेऊन पुढचे वाक्‍य बोलतो. शिवाजीराव भोसले यांची एकापुढे एक वाक्‍य, कुठेही न थांबता बोलण्याची पद्धत होती, तर अटलबिहारी वाजपेयी खूप वेळ मध्ये थांबून बोलत असत. म्हणून त्यांना "पॉजपेयी' म्हणत असत.

पॉजचे वेगवेगळे अर्थही निघू शकतात. नाटकातल्या "पॉज'ला खूप महत्त्व आहे. तो बऱ्याच वेळेला बोलका असतो. कारण नाटकातील संवादात मुद्दाम आणि अर्थपूर्ण थांबणे ही खासियत आणि परिणामकारकता असते. विशेषतः त्या पॉजमधील कृती ही परिणाम साधते म्हणूनच ऐतिहासिक, पौराणिक नाटकातील संवादफेक किंवा सामाजिक नाटकातील "स्वगत' प्रेक्षकांवर छाप पाडतात. सुगम संगीतातील भावभावना आणि शब्द पोहोचण्यासाठी किंवा गूढता, उत्सकता वाढवायला, विनोद पोहोचवायलाही "पॉज' उपयोगी ठरतो. मात्र तो जास्त झाल्यास संवाद परिणामहीन होतो. लेखनातही स्वल्पविराम, पूर्णविराम यासारखी विरामचिन्हे "पॉज' निर्माण करतात आणि योग्य तो परिणाम साधतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT