muktapeeth 
मुक्तपीठ

देवीच्या दारांत

सुरेखा सुहास जोग

श्रद्धा असली की देवी दर्शन देते... कधी एखाद्या हसतमुख चेहऱ्याने, तर कधी अपघातात वाचवून.

नवरात्रीत देवी लक्ष्मीचे मुखदर्शन सुखावणारे असते. पुण्यात आल्यावर सासूबाईंबरोबर चतुःशुंगी देवीला गेले होते. चारीबाजूंनी भल्या मोठ्या रांगा. सासूबाईंनी मला रांगेत उभे केले आणि त्या ओटीचे सामान आणायला गेल्या. एवढ्यात मला पाठीमागून इतके जोरात ढकलले गेले, की माझा थेट देवीच्या दारात साष्टांग नमस्कारच झाला. मान वर करून बघते तर देवीचे दर्शन झाले. एकदा तांबड्या जोगेश्‍वरीला गेले होते. मला "पास' मिळत होता, पण चार-चार तास रांगेत उभे राहणाऱ्या स्त्रीभक्तांना डावलून पुढे घुसणे मला योग्य वाटले नाही. मी रांगेत उभी राहिले. माझा क्रमांक येऊन मी मंदिरात जाणार एवढ्यात दार बंद झाले. मी मागे पाहिले, तर विनाचपला दूरवरून चालत आलेल्या, उपवास धरलेल्या, कडेवर लेकरू असलेल्या त्या स्त्रिया हसतमुख उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला देवीचे दर्शन घडवून गेला.

एका नवरात्रीला वैष्णोदेवीला गेलो होतो. आजच्यासारखा रोप वे नव्हता. मी आणि माझे पती डोलीतून निघालो. सगळीकडे वीजदिव्यांची झगमग, खाण्याचे स्टॉल, डॉक्‍टरांचे मदततंबू, सुरक्षा व्यवस्था, प्रसाद- ओटीचे सामान, महिलांचे अलंकार, प्रसन्न, मंगलमय वातावरण, सुवासिक फुलांचा गंध संपूर्ण परिसरात दरवळत होता. डोली उचलणारे "जय माताजी' म्हणत पायऱ्या चढत होते. माझे पती मागे वळून वळून काळजीपोटी पाहायचे. आता काळोख पडून लागला होता. एकीकडे देवीला पाहण्याची प्रचंड ओढ लागली होती. इतक्‍यात धापकन मोठा आवाज झाला. माझ्या डोलीची सुतळ तुटून मला समजायच्या आत मी खाली पडून सात-आठ पायऱ्या गडगडत खाली गेले. बाजूला खोल दरी होती. देवीच्या कृपेमुळेच मला काही झाले नाही. साधे खरचटलेसुद्धा नाही. पहाटे वैष्णोदेवीचे सुंदर दर्शन झाले. मनापासून देवीचे आभार मानले. डोली वाहून नेणाऱ्या लोकांचे. आभार मानले. मुखातून शब्द बाहेर पडले, ""माते, सर्वांचे कल्याण कर!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT