muktapeeth 
मुक्तपीठ

एक हृदयस्पर्शी पत्र

विजय तरवडे

काही गोष्टी देहाला चिकटून आल्यासारख्या असतात; पण एका क्षणी देह व ती गोष्ट यांचा संबंध संपतो. त्याच्या आठवणी...

प्रिय अहो,
स. न. वि. वि.

काळजावर दगड ठेवून हे पत्र लिहीत आहे. गेले काही दिवस मी गुपचूप निरीक्षण केलंय. तुम्हाला माझा कंटाळा आलाय. माझ्यापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही अनेक परक्‍यांशी सल्लामसलत करत आहात. मला कायमची घालवण्याचे बेत रचत आहात. तुमच्या चोरून चाललेल्या हालचाली मला समजत नाहीत असं का वाटतं तुम्हाला? चाळीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात? आपली ओळखदेखील नव्हती. पण तुम्हाला नोकरी लागली. तुमच्या आईवडिलांनी तुमचे दोनाचे चार हात केले. संसार सुरू झाला. आणि अवघ्या दीड-दोन वर्षांत ती जादू झाली. कधीही कुठेही आपण फिरायला गेलो आणि तुमचे मित्र, नातलग भेटले की आपल्याकडे निरखून बघत आणि कौतुकाने म्हणत, "बेट्या, लग्न मानवलं बरं का तुला.' तुम्हीदेखील मनापासून हसून होकार द्यायचा. तुम्हाला प्रमोशन मिळालं. तुम्ही सुटाबुटात फिरू लागला. तुमचे विविध रंगी नेकटाय खूप आवडायचे. तुमचं लक्ष नसताना त्या नेकटायचं टोक गालांवरून फिरवताना अगदी मोरपीस फिरवल्यासारखं वाटायचं. लक्षात ठेवा. तुमच्यावर मनोमन प्रेम केलंय मी. तुमच्याशी निष्ठा वाहिलीय. जगेन तर तुमच्यासह, तुमच्याशिवाय एकही क्षण जगणार नाही. सुखाच्या-दुःखाच्या प्रसंगी जेव्हा कोणी जवळचं नसेल तेव्हा तुम्ही एखाद्या कोचात-आरामखुर्चीत बसून कॉफीचे किंवा अपेयाचे घोट घेत तो क्षण जगायचात, माझ्यावरून आपला हात प्रेमाने फिरवून कुरवाळायचा. मी न बोलता सांगत असे की मी तुमचीच आहे. सगळं विसरलात का हो?

गेले काही दिवस तुम्हाला माझी लाज वाटायला लागलीय. चारचौघांत वावरताना तुम्हाला आपलं नातं लपवावंसं वाटू लागलं. हे जाणवल्यापासून मी खचले. खंगले. पण हे तुमच्या लक्षातदेखील आलं नाही. असो. पत्र फार लांबलं. माझा त्याग करायचा क्रूर निर्णय तुम्ही सोडणार नाही याची कल्पना आहे. पण तरी तुमचं सदैव भलं होवो असं मी चिंतीत राहीन.
तुमचीच
तुंदिलतनू ढेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT