मुंबई

कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण 1 टक्के; तर लक्षण असलेल्या रुग्णांंचीही संख्या कमी

भाग्यश्री भुवड

मुंबई  : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही जरी चिंतेची बाब असली तरी 14 लाख 42 हजार 968 कोव्हिड रुग्णांपैकी तब्बल  2 लाख 31 हजार 528 एवढे रुग्ण एकही लक्षण नसलेले  आणि सौम्य लक्षण असलेले रुग्ण आहेत. ज्याचे प्रमाण 16% टक्के एवढे आहे.

तर, 80 टक्के हे एकूण बरे झालेले रुग्ण असून 11 लाख 49 हजार 603 एवढी त्यांची संख्या आहे. या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात फक्त एक टक्का गंभीर रुग्ण असून 9 हजार 757 एवढी त्यांची संख्या आहे. दरम्यान, 13 हजार 996 एवढे रुग्ण आयसीयू बाहेरील असून ऑक्सिजनवर असलेले आहेत. त्यांचे ही प्रमाण 1 टक्के आहे. तर, आतापर्यंत 38 हजार 084 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून राज्यातील मृत्यू दर या आकडेवारीनुसार 2 टक्के आहे. 

महाराष्ट्रात दरदिवशी जवळपास 10 हजारांच्या वर नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. ज्यामुळे, राज्याची चिंता वाढली आहे. रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. मात्र, मृत्यूच्या दरात घट असल्यामुळे ही परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत 2 लाख 58 हजार 108 रुग्ण सक्रिय आहेत. त्यात ही लक्षण नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या तसेच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91 टक्के इतके आहे. हे प्रमाण दिलासादायक असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे. 

गंभीर रुग्णांची संख्या 13 हजार 996 असून, हे प्रमाण 5 टक्के असून, आयसीयूबाहेर पण ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचे प्रमाण 4 टक्के आहे. राज्यातील 2 लाख 31 हजार 528 रुग्ण हे लक्षण नसलेले, सौम्य लक्षणांसह बरे होण्याच्या मार्गावर असलेले आहेत. ज्याचे प्रमाण 91 टक्के आहे.  त्यामुळे करोना संसर्ग झाला, तरी तो नियंत्रणात येऊ शकतो, हा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या वा पॉझिटिव्ह असूनही कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्ण संसर्ग पसरवण्यासाठी सक्रिय असतात का, यावर ही ठोस अभ्यास सुरू असून हे रुग्ण काही प्रमाणात संसर्ग पसरवू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   त्यामुळे, त्यांच्या घरी संबंधित सुविधा असल्यास निवासस्थानीच विलग राहण्याचा सल्ला देण्यात येतो.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT