Anil Deshmukh File photo
मुंबई

१० बार मालकांनी अनिल देशमुखांना चार कोटी रुपये दिले - ED

तीन महिने चार कोटी रुपये दिले.

दीनानाथ परब

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी आज ईडीकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली. एका चार कोटी रुपयांच्या प्रकरणात ही छापेमारीची (ed raid) कारवाई झाली आहे. मुंबईतील १० बार मालकांनी (bar owners) अनिल देशमुख यांना तीन महिने चार कोटी रुपये दिल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. (10 bar owners in Mumbai paid Rs four crore to Anil Deshmukh for three months ED)

अनिल देशमुखांविरोधात आर्थिक अफरातफरीचे प्रकरण ईडीने नोंदवले आहे. या प्रकरणात मिळालेल्या नव्या माहितीच्या आधारावर ईडीने देशमुखांच्या नागपूर, मुंबईसह चार ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. मुंबईमध्ये ईडीचे पथक अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या निवासस्थानी सुद्धा शोध घेत आहे. बार मालकांनी देशमुखांना रोख रक्कम दिली. ते पुरावे ईडीने मिळवले असून त्या आधारावर ही कारवाई सुरु आहे.

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या १० बार मालकांची जबानी ईडीने नोंदवली आहे. ईडी देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची चैौकशी करत आहे. त्याचप्रमाणे सीबीआय सुद्धा १०० कोटीच्या वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे. अनिल देशमुखांवर त्यांनी बर्खास्त सहाय्याक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला दर महिन्याला मुंबईतील १७५० बार आणि हॉटेल चालकांकडून महिन्याला १०० कोटींची वसुली करायला सांगितल्याचा आरोप आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी २० मार्चला देशमुखांवर हा गंभीर आरोप केला होता. तो आरोप देशमुखांनी फेटाळून लावला. ईडीच्या या कारवाईमुळे सध्या अनिल देशमुख यांना अटक करण्याची तयारी ईडीकडून केली जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे दिसतंय.

मुंबई

1) वरळीच्या अनिल देशमुख यांच्या सुखदा बिल्डिंगमध्ये

2) सरकारी निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगला येथे

3) वरळी राहणाऱ्या अनिल देशमुखांच्या CAच्या घरी

नागपूर

1) अनिल देशमुखांच्या नागपूर निवासस्थानी

2) अनिल देशमुखांचे बिजनेस पार्टनर असलेल्या सागर भातेवार यांच्या शिवाजी नगर येथील घरी

त्याशिवाय, प्रत्येक टिममध्ये 6 ते 7 अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान असल्याची माहिती आहे. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तही मागवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT