मुंबई

मेट्रो 3 मार्गाच्या भुयारीकरणाच्या कामासाठी 10 हजार स्फोट

तेजस वाघमारे

मुंबई:  कुलाबा- सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गाच्या खोदकामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला तब्बल 10 हजार नियंत्रित स्फोट घडवावे लागले आहे. या मार्गावर आतापर्यंत 48 किलोमीटर लांबीचे 32 भुयार खोदण्यात आलेत. हा मार्ग पूर्ण होण्यासाठी अजून काळबादेवी, कफ परेड, हुतात्मा स्मारक, चर्चगेट असं 6 किलोमीटरचे भुयार खोदावे लागणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन पहिल्यांदा स्फोटकासंबधी माहिती दिली आहे. नुकतेच दादर भागातील भुयाराचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबईची कठिण भौगौलिक रचना बघता या शहरात भुयार खोदणे आव्हानात्मक काम असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी (प्रकल्प) सुबोध गुप्ता यांनी म्हटलंय. काळबादेवी ते चर्गगेट, गिरगाव, मरोळ , सांताक्रूझ भागातील  खोदकामासाठी कॉर्पोरेशन सध्या 7 टनेल बोरींग मशीन, ऑस्ट्रेलियन टनेलिंग सिस्टीमचा वापर करत आहे. स्फोटकामुळे भुगर्भात अधिक कंप निर्माण होतात. त्याची तीव्रता स्फोटापेक्षा अधिक असते.

यापूर्वी  2018 मध्ये कफ परेड भागातील राहीवाशांनी भूंकपासारखा आवाज येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण न्यायलयात गेले होते. माहीम भागातील मेहर मंजील या इमारतीला या स्फोटकामुळे तडे गेले होते. पश्चिम रेल्वेनेही मेट्रोच्या कामामुळे त्यांच्या हेरीटेज दर्जा असलेल्या मुख्यालयाच्या इमारतीमध्ये कंप निर्माण होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मेट्रोच्या कामामुळे पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. येत्या काही दिवसात महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सीएसटीएम, आंतरदेशीय विमातळासह 9 भुयारी मार्गाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

10 thousand blasts for Metro 3 mumbai underground work

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT