पूरग्रस्तांना मदत पाठवताना किरण सुरवसे, डॉ, दीपक क्षीरसागर आणि अन्य अधिकारी, कर्मचारी.  
मुंबई

महसूलतर्फे पूरग्रस्तांना १० टन धान्य

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना सर्वच स्तरातून मदत केली जात असून पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनीही जिल्ह्यातील महसूल विभागाला मदतीचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत वसईचे तहसीलदार किरण सुरवसे आणि उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. दीपक क्षीरसागर यांच्या पुढाकारातून गुरुवारी (ता.१५) स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून १० टन धान्य आणि वस्तूरूपी मदतीचा मोठा ट्रक पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आला. 

वसईच्या तहसील कार्यालयात पूरग्रस्तांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला होता. यात अनेक सामाजिक संस्था, दानशूरांकडून वेगवेगळ्या स्वरूपात मदत आली होती. तसेच महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळून एक ट्रक भरून मदत पूरग्रस्तांना पाठविली. यात ३०४ जीवनावश्‍यक वस्तूंचे किट, १५०० किलो तांदूळ, १३० किलो साखर, २२१ किलो डाळी, बिस्कीट पाकीट, पाण्याच्या बाटल्यांचे ४८७ बॉक्‍स, १०० बेडशीट, ४७५ ब्लॅंकेट, १ हजार २५ पेटीकोट आणि रक्षाबंधनानिमित्त पूरग्रस्त बहिणींना ४ हजार २३३ साड्या मदत स्वरूपात पाठवण्यात आल्या आहेत.  

सामाजिक संस्था, कार्यकर्ते, दानशूर व्यक्तींनी पूरग्रस्तांना प्रशासनाच्या माध्यमातून मदत द्यावी. त्यामुळे ती खऱ्या गरजूंपर्यंत जाईल. पूरग्रस्तांच्या संसाराला उभारी देण्यासाठी आणि रक्षाबंधनानिमित्त बहिणींना भेट म्हणून आजचा दिवस निवडून आम्ही मदत पाठविली आहे.
- डॉ. दीपक क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी, वसई 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT