mumbai municipal corporation
mumbai municipal corporation sakal
मुंबई

Recruitment : मुंबई महानगरपालिकेत १० हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेचा २०१७ पासून रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग होणार मोकळा.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा २०१७ पासून रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पालिकेतील विविध पदांअंतर्गतच्या सुमारे १० हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठीचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकारच्या शासन आदेशाच्या पाठोपाठच मुंबई महानगरपालिकाही भरतीबाबतचे एक परिपत्रक जारी करणार आहे. त्यामुळे पालिकेतील विविध विभागनिहाय भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्रयस्थ संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करण्याबाबतची स्पष्टता या परिपत्रकामुळे येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला भरती करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करता येईल. कोरोनामुळेही ही भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांमध्ये रखडली होती.

मुंबई महानगरपालिकेच्या १० हजार कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून मंदावली होती. परंतु शासनाच्या अध्यादेशामुळे आता एजन्सी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेकडूनही परिपत्रक काढण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये एजन्सीसोबत करण्याचे करार, अटी व शर्थी यासारख्या बाबींचा समावेश असणार आहे. त्यामुळेच पालिकेच्या विविध विभागांमध्ये असलेली मनुष्यबळाची भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करता येणे शक्य होणार आहे. येत्या आठवड्याभरात हे परिपत्रक पालिकेकडून जारी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पालिकेतील विविध विभागांना भरती प्रक्रियेसाठीची एजन्सी नेमून रिक्त जागांची भरती करणे शक्य होईल. परिपत्रक निघाल्यानंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यात ही प्रक्रिया पुर्ण करणे शक्य असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे नव्या वर्षात जानेवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य सरकारकडून फेब्रुवारी, मे आणि ऑक्टोबर असे तीनवेळा भरती प्रक्रियेसाठीचे शासन आदेश निघाले. त्यामुळेच पालिकेलाही यानुसारच परिपत्रक जारी करावे लागणार आहे. याआधीही पालिकेने परिपत्रक जारी करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु नव्या आदेशामुळेच हे परिपत्रक जारी करण्यापासून रखडले. आता शासनाचे तिसऱ्यांदा आदेश आल्याने पालिका विविध विभागांना परिपत्रक जारी करणार आहे. त्यानंतरच भरती प्रक्रियेला सुरूवात होईल.

मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात सध्या १६०० लिपिकांच्या जागा रिक्त आहेत. त्यानुसारच पालिकेच्या विविध विभागांमध्ये जागा रिक्त आहेत. पालिकेच्या विविध विभागांच्या गरजेनुसार ही भरती प्रक्रिया आगामी महिन्याभरात सुरू होणे अपेक्षित आहे. भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या आदेशानुसार टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT