मुंबई

#BREAKING : भाटिया रुग्णालयात आणखी 11 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाटिया रुग्णालयात मागील बुधवारी तीन रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 11 जणांना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाटिया रुग्णालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित पावले उचलली आहेत. अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात हलवले आहे. उपचार पूर्ण झालेल्या रुग्णांना गुरुवारीच घरी पाठवण्यात आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी आणखी सुमारे 150 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यातील 110 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. काही कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप मिळालेल नाहीत. तेथील 25 कर्मचाऱ्यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर 24 तास लक्ष ठेवले जात आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. 
चाचणी निगेटिव्ह आलेल्या 159 कर्मचाऱ्यांना दोन गटांत विभागले आहे. त्यापैकी कमी जोखीम गटातील कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून, घरातच अलग राहण्यास सांगितले आहे. अति जोखीम गटातील कर्मचाऱ्यांना रुग्णालयातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

11 more employees admitted to Corona at Bhatia Hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream XI च्या गच्छतीनंतर BCCI ने आणली IPL Fantasy League, टीम निवडा, बक्षिसे जिंका, पण नियम काय?

Uttarakhand News : उत्तराखंडचा कायापालट! हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत धावणार 'रॅपिड रेल'; मुख्यमंत्री धामींचा पंतप्रधान मोदींकडे कनेक्टिव्हिटी आणि संरक्षणाचा 'महाप्लॅन'

Latest Marathi News Live Update : लॉकडाउनची अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई - देवेंद्र फडणवीस

'या' ४ मूलांकाचे लोक असतात सर्वांत जास्त रागीट; समोर शांत पण खुन्नस ठेऊन घेतात बदला, त्यांना नाराज कराल तर उलटे दिवस सुरू

Unseasonal Rain : शिराळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वादळामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT