मुंबई

शहापुरातील 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

शहापूर (ठाणे) : शहापुरातील एका कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क आला म्हणून विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सर्व ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी ही माहिती दिल्याने शहापूरकरांनी काही अंशी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या शहापूर तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. 67 वर्षीय हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी जाहीर केले. या 67 वर्षीय रुग्णाला दम्याचा त्रास होत असल्याने त्याला प्रथम शहापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर संबंधित रुग्णाला ठाणे येथील होरिझन या रुग्णालयात 7 एप्रिलला दाखल करण्यात आले. या रुग्णाची ठाणे शहराच्या पश्चिम भागातील एका खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यापैकी 7 जण भिवंडी येथे तर इतर 4 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. या 11 जणांपैकी 4 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तर उर्वरित 7 जणांच्या चाचणीचे अहवाल बुधवारी (ता. 22) प्राप्त होणार होते. त्यानुसार 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT