खोट्या नोटा शोधण्याच्या बहाण्याने बॅंक खातेदाराला गंडा 
मुंबई

खोट्या नोटा शोधण्याच्या बहाण्याने बॅंक खातेदाराला गंडा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मानखुर्द येथील हिंदुस्तान बॅंकेच्या खातेदाराची फसवणूक करून ११ हजार रुपये चोरल्याच्या आरोपाखाली फिरोज खान (५६, रा. आंबिवली) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील रहिवासी आहे. त्याने व त्याच्या साथीदाराने राकेशकुमार चव्हाण यांचे अकरा हजार रुपये घेऊन पळ काढला होता. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

राकेशकुमार चव्हाण यांनी बुधवारी सकाळी हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या मानखुर्द शाखेतून ८५ हजार रुपये काढले. बॅंकेतील बाकावर पैसे मोजत बसले असता त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी बोलण्यात गुंतवले. त्यापैकी एकाने बंडलातील ५०० रुपयांची नोट खोटी असल्याचे सांगितले. खोट्या नोटा काढून देतो, असे सांगत त्याने चव्हाण यांच्याकडून ५० हजारांचे बंडल घेतले. त्यातील ११ हजार रुपये गुपचूप काढून घेतल्यानंतर ते दोघेही पसार झाले. त्यानंतर चव्हाण यांनी पुन्हा पैसे मोजले असता बंडलात ५०० रुपयांच्या २२ नोटा कमी असल्याचे आढळले.  चव्हाण यांनी तातडीने मानखुर्द पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Al Qaeda Attack: लाल किल्ला दहशतवादी हल्ल्यामागे ‘अल कायदा’; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Pune Accident : कात्रज चौकात PMPML बसचे ब्रेक फेल, चालकाचे नियंत्रण सुटले; ४ ते ५ वाहनांना धडक...

Marathi News Live Updates : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; प्रवाशांना खबरदारीचे आवाहन

Dharashiv Drug Raid: धाराशिवमध्ये गांजा-चरस विक्रीवर पोलिसांचा छापा; २२ तोळे सोने, रोकडसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Flat Row: मुंबईत पुन्हा मांसाहारावरून वाद! मनसेची पोलिसांत तक्रार; ठाकरेंची शिवसेना आक्रमक

SCROLL FOR NEXT