अकरा वर्षांचा तनिष प्रकाश महाडिक. 
मुंबई

मुलाच्या धाडसामुळे चोरटा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भर दुपारी घरात कोणी नसल्याची संधी साधत घरफोडी करून, फरारी होणारा सराईत चोरटा ११ वर्षांच्या मुलाच्या धाडसामुळे जाळ्यात सापडला. आपल्या आईचा सोन्याचा हार घेऊन चोरटा पळत असताना मुलाने हार हिसकावत आरडाओरडा केला. त्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनी चोरट्याला पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी चोरटा अब्दुल गफार खान याला अटक केली असून त्याने आतापर्यंत सहा ते सात चोऱ्या केल्याचे समोर आले आहे.

विरार पश्‍चिम एम. बी. इस्टेटमध्ये तपोवन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ३०१ या रूममध्ये दिव्या व प्रकाश महाडिक आपल्या दोन मुलांसह राहतात. मंगळवारी (ता. २०) अकरा वर्षांचा मुलगा तनिष हा एकटाच होता. दरम्यान, घरातील रिपेअरिंगच्या कामाचा बहाणा करून चोरटा जबरदस्तीने घरात घुसला. चोरट्याने कपाट उघडून घरातील सोन्याचे दागिने घेऊन फ़रार होण्याच्या तयारीत होता. दरम्यान, आई व मुलाचा आरडाओरडा ऐकुन शेजारचे लोक जमा झाले व  पाठलाग करून चोराला पकडले. लोकांनी चोरट्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT