Karian & Amruta Tweeter
मुंबई

करिना, अमृतानंतर 'त्या' सर्वांचा कोरोना रिपोर्ट आला समोर...

बॉलिवूड पार्ट्या कोरोनाचा सुपर स्पेडर ठरणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

निनाद कुलकर्णी

मुंबई : निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेल्या ओयोजित केलेल्या पार्टीनंतर काही बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बॉलिवूड पार्ट्या कोरोनाचा सुपर स्पेडर ठरणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्टीनंतर करीना कपूर, अमृता अरोरा, सोहैल खानची पत्नी सीमा खान आणि अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्या सर्वांचा कोरोना रिपोर्ट आज प्राप्त झाला आहे.

दरम्यान, या पार्टीत सहभागी झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कलाकारांच्या संपर्कात आलेल्या 110 जणांचा कोरोना टेस्ट रिपोर्टमध्ये एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

बॉलिवूड सूपरस्टार करिना कपूर आणि अमृता अरोरा (Kareena Kapoor Khan & Amrita Arora) यांची कोविड 19 संसर्ग चाचणी पाॉझिटिव्ह आल्यानंतर सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर यांचादेखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर करण जोहरसह त्याच्या कुटुंबीयांची RTPCR चाचणी करण्यात आली असता त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याविषयी करण जोहरने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे.

करण जोहरची पोस्ट

'मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने RTPCR टेस्ट केली असून देवाच्या कृपेने सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सुरक्षेखातर मी दोन वेळा चाचणी केली असून दोन्ही वेळा माझे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शहराच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगरपालिका करत असलेल्या कामगिरीचं मी खरंच कौतुक करतो. त्यांना माझा सलाम. माध्यमांच्या काही सदस्यांना मी सांगू इच्छितो की ८ जण एकत्र आले की पार्टी होत नाही आणि माझं घर हे काही कोविडचं हॉटस्पॉट नाही. आम्ही घरात काटेकोरपणे नियमांचं पालन करतो. आम्ही सर्वजण जबाबदार नागरिकांप्रमाणे वागतोय आणि मास्कचा सतत वापर करतोय. तथ्य काय आहे याची पडताळणी न करता वृत्त देणाऱ्या काही माध्यमांच्या सदस्यांना माझी विनंती आहे की त्यांनी संयम बाळगावा', अशी पोस्ट करण जोहरने लिहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT