मुंबई

ठाण्यात ११ हजार पिशव्या रक्तसंकलन

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राज्यभरात असलेला रक्ततुटवडा लक्षात घेऊन नवरात्रीचे औचित्य साधून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात महारक्तदान सप्ताह उत्साहात झाला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे सात दिवसांत विक्रमी तब्बल ११ हजार २ पिशव्या रक्तसंकलन केले. भिवंडीचे विनीत म्हात्रे हे १० हजारावे रक्तदाते, तर कोपरी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ममता डिसुझा ११ हजाराव्या रक्तदात्या ठरल्या.

शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित महारक्तदान सप्ताहात अवघ्या सात दिवसांत ११ हजार २ पिशव्या रक्तसंकलन झाल्याने या ब्लड बँकांना, रुग्णांना दिलासा मिळाला. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी याबद्दल शिंदे यांचे आभार मानले. अभिनेते प्रवीण तरडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यासाठी योगदान देणारे डॉक्टर्स, ब्लड बँकांचे प्रतिनिधी, आरोग्यसेवक, शिवसेनेचे निवडक पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

या वेळी एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, अभिनेते कुशल बद्रिके, ठाणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, परिमंडळ एकचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनीही रक्तदान केले. कृषिमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, अभिनेते शरद पोंक्षे, अभिजित चव्हाण यांनी संवाद साधला. याप्रसंगी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, शांताराम मोरे, महापौर नरेश म्हस्के, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील उपस्थित होते.

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अद्याप प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या रक्त तयार करता येत नाही. त्यामुळे माणसालाच माणसाचा जीव वाचवण्याचे काम करायचे असून, अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले पाहिजे.

- एकनाथ शिंदे, पालकमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT