Loksabha Election 2024 Esakal
मुंबई

Mumbai Loksabha Election : मुंबईत लोकसभा निवडणूक रिंगणात ११६ उमेदवार; आठ उमेदवारांची माघार

मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघातून तब्बल ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघातून तब्बल ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ८ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. सध्याचे निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार पाहता महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील सहा लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने २६ एप्रिल रोजी अधिसुचना जारी केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानुसार आलेल्या आर्जांची छाननी झाल्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता.

त्यानुसार वेगवेगळ्या मतदारसंघातील ८ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असल्याने प्रत्यक्ष रिंगणात आता ११६ उमेदवार राहिले असून त्यांच्यासाठी २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय आधिका-यांनी स्पष्ट केले आहे.

दक्षिण मुंबई - १४ उमेदवार

प्रमुख लढत - अरिवंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) - यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट)

दक्षिण मध्य मुंबई - १५ उमेदवार

प्रमुख लढत - राहूल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) - अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)

उत्तर मध्य मुंबई - २७ उमेदवार

प्रमुख लढत - वर्षा गायकवाड (काँग्रेस) - एॅड. उज्वल निकम (भाजपा)

उत्तर पश्चिम मुंबई - २१ उमेदवार

प्रमुख लढत - अमोल कीर्तिकर (शिवसेना ठाकरे गट) - रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)

उत्तर मुंबई - १९ उमेदवार

प्रमुख लढत - पियुष गोयल (भाजपा) - भूषण पाटील (काँग्रेस)

उत्तर पूर्व मुंबई - २० उमेदवार

प्रमुख लढत - संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) - मिहिर कोटेचा (भाजपा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT