11th Admission esakal
मुंबई

11th Admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश रामभरोसे? माहिती पुस्तिकाच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी संभ्रमात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी भाग १ ची नोंदणी आणि त्याची मुदत संपल्यानंतर आता भाग २ साठी नोंदणी सुरू आहे. ती नोंदणी पुढील दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी संबंधित महाविद्यालयांची माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

पण शिक्षण विभागाकडून अद्याप प्रवेशाच्या संदर्भातील महाविद्यालयांची माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. परिणामी प्रवेश प्रक्रिया रामभरोसे चालू आहे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती आणि नागपूर अशा पाच महापालिका क्षेत्रांत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया काही आठवड्यांपासून सुरू झाली आहे. प्रवेशासाठी भाग २ भरण्याकरिता विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची पसंती नोंदवावी लागते.

त्यासाठी प्रत्येक वर्षी शिक्षण विभागाकडून संबंधित महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका प्रसिद्ध करून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते. माहिती पुस्तिकेमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालय, त्यातील शाखा आणि शुल्कासंदर्भातील माहिती मिळत असते.

त्यानुसार विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाच्या पसंतीक्रमाची नोंदणी करतात. मात्र, आता दुसऱ्या भागाच्या नोंदणीला केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला असताना आतापर्यंत एकाही महापालिका क्षेत्रात विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा कोणत्याच पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

अशी असते माहिती

1 अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणी करताना विद्यार्थ्यांकडून माहिती पुस्तिकेसाठी अतिरिक्त रक्कम आकारली जाते. पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा आणि प्रवेशांच्या जागा, त्यासोबतच शुल्काची माहिती उपलब्ध होते.

2 माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॉगिन आणि त्यावरील पासवर्डदेखील उपलब्ध करून दिला जातो.

3 कोरोनानंतर मागील दोन वर्षांत माहिती पुस्तिका ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, यंदा ती अजूनही अपलोड करण्यात आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT