11th to 25th January Safety Mission of ST Corporation Instructions to Section Controllers to strictly follow traffic rules mumbai sakal
मुंबई

MSRTC Safety Mission : बसेसची वेगमर्यादा पाळा अपघात टाळा

एसटी महामंडळाचे राज्यभरात 11 ते 25 जानेवारी सुरक्षितता अभियान; वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या विभाग नियंत्रकांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रस्ते वाहतूकीत सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी, बसेसचे अपघात टाळण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केला जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांकडून बस वाहतुक करतांना वाहतुक नियमांचे पालन करून नियमीतपणे अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभरात 11 जानेवारी पासून राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याच्या सुचना व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिल्या आहे.

यादरम्यान एसटी महामंडळात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून सर्व आगारांमध्ये चालक, यांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करने, परिवहन,पोलिस आणि इतर सामाजिक संस्थाचे प्रतिनीधी अपघात टाळण्याच्या उपाययोजना सांगणे, प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृध्दींगत करणे

कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालुन दिलेल्या कार्यपध्दती पाळण्यावर भर देणे, एसटीचा अपघात होणार नाहीत यासाठी नेहमी योग्य ती काळजी घेण्याचे सुद्धा मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्याशिवाय वाहनांची तपासणी नेहमी अत्यंत काटेकोरपणे करावी व सर्व वाहने सुस्थितीत ठेवण्यात यावीत, सर्व आगार प्रमुख व पर्यवेक्षक कर्मचा-यांनी अपघाताकडे कल असलेल्या चालकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, वेगमर्यादा न पाळल्यामुळे,

वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे व योग्य पद्धतीने वाहन न चालविल्यामुळे होणा-या अपघातांबाबत अधिक विशेष लक्ष पुरविले पाहिजे, सुरक्षित प्रवास होण्याच्या गरजेबद्दल सर्व चालकांनी जागरुक असले पाहिजे, कार्यशाळेमधुन बाहेर पडणारी वाहने नेहमी मार्गावर धावण्याच्या निर्दोष स्थितीत असल्याबद्दल सर्व यंत्र अभियांत्रिकी कर्मचा-यानी वाहनांची खात्री करुन घेण्यावर सुद्धा भर देण्याच्या सुचना याद्वारे विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे ZP निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी, कोणत्या पक्षातून कोण जिकलं? वाचा एका क्लिकवर

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: १२ पैकी ८ परिषदा महायुतीच्या असतील - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Satara ZP Result 2026 : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे खंदे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना होमग्राऊंडवर धक्का; पत्नी अर्चना रांजणे यांचा 180 मतांनी पराभव

Navi Mumbai: नवी मुंबईकरांना दिलासा! गावठाण घरांवरील अन्यायकारक दंड रद्द करण्याचा निर्णय; गरजू ग्रामस्थांना न्याय

पंतप्रधानांना धोका; लोकसभेत ओम बिर्ला यांचा सल्ला आणि मोदींचा निर्णय

SCROLL FOR NEXT