RAILWAY STATION SAKAL
मुंबई

IRSDC करणार मुंबईच्या महत्वाच्या रेल्वे स्थानकांचा कायापालट!

नरेश शेंडे

मुंबई : मुंबईची लाईफलाईन (Mumbai Railway) असणाऱ्या रेल्वे ट्रेन स्थानकांचा कायापालट होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधा लक्षात घेता रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करणे महत्त्वाचं असल्याने भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (IRSDC) रेल्वे स्टेशन्सचा कायापालट करण्याचा पवित्रा घेतला आहे. मुंबईच्या महत्वाच्या रेल्वे स्थानकांत अंधेरी रेल्वेस्थानकंही (Andheri railway station) अग्रस्थानी आहे. देशभरात रेल्वे स्थानकांची विकासाची गती वाढविण्याच्या दृष्टीकोनातून IRSDC टप्पेनिहाय कामांतून अंधेरी रेल्वे स्थानकाचा विकास करणार आहे. ४.३१ एकर एवढ्या क्षेत्रात या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. यापैकी २.१ एकरमध्ये पहिल्या टप्प्यात बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित क्षेत्र हे दुसऱ्या टप्प्यासाठी असणार आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी असणाऱ्या प्रकल्पाची किंमत तब्बल २१८ कोटी रुपये इतकी आहे. ( 123 Railway stations redevelops IRSDC RLDA including Andheri Csmt dadar thane railway station)

विशेष म्हणजे अंधेरी रेल्वे स्थानकासोबत मुंबईच्या इतरही महत्वाच्या रेल्वे स्थानकांचा IRSDC पुनर्विकास करणार आहे.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर,कल्याण,ठाकुर्ली,बांद्रा,ठाणे आणि बोरीवली रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून होणारे काम हे एका वेगळ्या स्तरावर असणार आहे. हा प्रकल्प निर्धारील वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे.अशी माहिती IRSDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालत एस.के.लोहीया यांनी दिली आहे. ६३ रेल्वे स्थानकांवर IRSDC अंतर्गत काम सुरु आहे.तर RLDAच्या माध्यमातून ६० रेल्वे स्थानकांवर काम सुरु आहे. १२३ रेल्वे स्थानकांच्या पु्नर्विकास व स्थावर मालमत्तेच्या कामासाठी तब्बल ५०००० कोटी रुपयांच्या गु्ंतवणूकीची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT